मोदींकडून झाडाझडती घेण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला 'डोस'

पंतप्रधान मोदी घेणार कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांची झाडाझडती.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : कोरोना लसीकरणात (Corona Vaccination) महाराष्ट्रातील काही जिल्हे मागे पडले आहेत. तसेच देशातील इतर काही राज्यांतील जिल्ह्यांतील प्रमाणही अपेक्षित नाही. या जिल्ह्यांची झाडाझडती बुधवारी (ता. 3) खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) घेणार आहेत. व्हि़डीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते या प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. पण त्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश दिले आहे.

कोरोना लसीकरणाला गती आणण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे, असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आपआपल्या जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्व स्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सुचनाही केल्या.

Uddhav Thackeray
भाजपला मोठा दिलासा; नऊ जणांची उमेदवारी वाचली अन् सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं

भारताने नुकताच लसीकरणातील 100 कोटी डोसचा टप्पा पार केला आहे. पण असे असले तरी अद्याप दोन डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये पहिला डोसचे प्रमाणही देशाच्या तुलनेत खूप कमी आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. परिणामी, संपूर्ण राज्याच्या लसीकरणाच्या मोहिमेवर त्याचा परिणाम होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून आता लसीकरणाला वेग देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोविडचा संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोविड गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांना सतत करुन द्यायला हवी. लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्त़न ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहिम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात आहेत. प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणबाबत संदेश दाखविण्यात यावेत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Uddhav Thackeray
निवडणूक खर्च वेळेत सादर न करणे भोवले : सरपंच, उपसरपंचाने गमावले पद

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण मोहिमेत स्थानिक पदाधिकारी यांचा सहभाग घेण्यास सांगितले. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर यांना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य करण्यात यावेत. डोंगरी भागात मोबाईल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे, अशा सुचनाही त्यांनी केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com