मला चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्याचा धोका : समीर वानखेडेंचे मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र

मला ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
Sameer Wankhede
Sameer WankhedeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळी वळणे घेत आहे. या प्रकरणातील पंच किरण गोसावीच्या बॉडीगार्डन केलेल्या खळबळजनक आरोपानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. मला तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देण्यात आलेल्या आहेत. हे प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे सोपविण्यात आलेले आहे, त्यामुळे पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी या पत्रातून त्यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे. (Police should not take any action against me : Sameer Wankhede's letter to Mumbai Commissioner)

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं असून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केलेल्या खुलाशांमुळे खळबळ उडाली आहे. आर्यनला एनसीबीने पकडल्यानंतर त्याच रात्री गोसावी व सॅम नावाचा व्यक्ती शाहरुखच्या मॅनेजरला भेटले होते. त्यावेळी त्यांच्या पैशांची बोलणी झाली होती. त्यानंतर सकाळी एका व्यक्तीकडून 50 लाख रुपये घेतल्याचा खुलासा बॉडीगार्ड साईलने आज सकाळी केला होता. त्यानंतर एनसीबीकडे दुपारी पत्रक काढून खुलासा करण्यात आला होता.

Sameer Wankhede
गोसावीच्या बॉडीगार्डच्या बॉम्बनंतर वानखेडेंचे 'ते' शब्द मलिकांनाही आठवले!

समीर वानखेडे यांनी रविवारी (ता. २४ ऑक्टोबर) सायंकाळी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहेत. त्यात वानखेडे यांनी म्हटले आहे की, मला ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ नये, कारण, हे प्रकरण आता माझ्या वरिष्ठांकडे सोपविण्यात आलेले आहे. मला तुरुंगात टाकण्याचा आणि नोकरीतून काढून टाकण्याच्या धमक्या काही लोकांकडून यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत, असे सांगून त्यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

Sameer Wankhede
मी आधीच सांगत होतो, समीर वानखेडे तोडपाणी करणारा माणूस आहे

पत्रात वानखोडे यांनी पुढे म्हटले आहे की, हे प्रकरण डीडीजी यांनी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवले आहे, त्यामुळे पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जाऊ नये. मुंबई पोलिस आयुक्तांबरोबरच ह्या पत्राची कॉपी पोलिस महासंचालकांनाही देण्यात आलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com