Ganesh idol case : ‘पीओपी’ मूर्तीचे विसर्जन कुठं अन् कसं करावं; राज्य सरकारला मार्गदर्शनाला वेळ मिळेना

POP Ganesh Idol Immersion Hearing Demanded in Bombay High Court by Mumbai Ganeshotsav Committee : पीओपी मूर्तींच्या विसर्जनासंदर्भातील याचिका सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
Ganesh idol case
Ganesh idol caseSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Ganpati festival court case : गणेशमूर्ती फक्त मातीची की ‘पीओपी’ची या मुद्द्यावरून तापलेले वातावरण शमते न् शमते तेच ‘पीओपी’ गणेशमूर्तीचे विसर्जन कुठे किंवा कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आषाढ महिना लागताच आगामी सणवारांची चर्चा सुरू होते.

विशेषतः मुंबईत भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारीला मंडळे लागली आहेत. परंतु, गणेशोत्सवासाठी पीओपी मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारने अजून कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक प्रणाली जाहीर केलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

‘पीओपी’ अर्थात प्लास्टर् ऑफ पॅरिस वापरुन बनवलेल्या मूर्तीवरील बंदी न्यायालयाने (Court) उठवली. आता विसर्जन करण्याबाबत सुनावणी करावी, अशी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला विनंती करण्याची मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मंडळाने निवेदन दिले. पीओपी मूर्तींच्या विसर्जनासंदर्भातील याचिका सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. नुकतीच न्यायालयात यासंदर्भात सुनावणी झाली. राज्यात विशेषतः मुंबईत उंचच उंच गणेशमूर्ती स्थापन करण्याची पद्धत आहे. पूर्वीपासून मातीपेक्षा भक्कम, अशा पीओपी मूर्ती बसवण्यावर मंडळांचा होता.

Ganesh idol case
Anil Parab vs Yogesh Kadam : अनिल परबांनी 'ती' पाच प्रकरणं काढत शिवसेना मंत्र्यावर 'घाव'च घातला; बावनकुळे निलंबनाची कारवाई करणार का?

जून महिन्यात न्यायालयाने पीओपी मूर्ती तयार करून विकण्यावर घातलेली बंदी उठवली. त्यानंतर मूर्तिकार आणि गणेश मंडळांनी जल्लोष केला. मात्र, पर्यावरणपूरक नसल्यामुळे पीओपी मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोत असणाऱ्या ठिकाणी न करता कृत्रिम जलाशयात करण्याची अट न्यायालयाने काम ठेवली आहे. त्यामुळे मंडळांना पीओपी मूर्ती विसर्जनासाठी नियमावलीची गरज भासणार आहे.

Ganesh idol case
Warkari attack : फडणवीस विलासी राजकारणात रममान, नाक घासून माफी मागावी; शरद पवारांच्या पक्षाची मागणी

या प्रश्नावर न्यायालयाने राज्य सरकारला 21 जुलै रोजी धोरणात्मक निर्णय सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच वेळी पुढील सुनावणी घेण्याचे ठरवले आहे. मुंबईत सुमारे 12 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कार्यरत असून, त्यापैकी अनेक मंडळे गणपती आगमनाचे कार्यक्रम जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून आयोजित करणार आहेत. त्यामुळे त्याआधीच विसर्जन मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले आहे.

विशेष म्हणजे, यावर्षी फेब्रुवारीत झालेल्या माघी गणेशोत्सवातदेखील मार्गदर्शक तत्त्व नसल्यामुळे अनेक मंडळांच्या मूर्तींचे अद्याप विसर्जन झालेले नाही, ही बाब समितीने स्पष्ट केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com