Mumbai teacher POCSO FIR : पालकांना हादरवणारी घटना; 40 वर्षीय शिक्षिकेकडून 16 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

POCSO Case Against Renowned Mumbai Female Teacher for Sexual Abuse of Class 12 Student : मुंबईतील नामांकित शाळेत विद्यार्थ्यावर लैगिंक अत्याचाराच्या आरोपाखाली 40 वर्षीय महिला शिक्षिकेला अटक केली आहे.
Mumbai teacher POCSO FIR
Mumbai teacher POCSO FIRSarkarnama
Published on
Updated on

POCSO case Mumbai : मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेतील 40 वर्षीय महिला शिक्षिकेनं वर्षभरात 16 वर्षीय विद्यार्थ्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या आरोपाखाली शिक्षिकेला अटक देखील करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

विवाहित आणि मुले असलेली ही महिला, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा, बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या तरतुदींनुसार तिच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. हा अहवाल दाखल करताना शाळेकडून या प्रकरणावर त्वरित कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला इंग्रजीची शिक्षिका (Teacher) आहे आणि ती पीडित विद्यार्थ्याला अकरावीत असताना शिकवत होती. डिसेंबर 2023मध्ये होणाऱ्या वार्षिक शाळेच्या कार्यक्रमासाठी नृत्य गट स्थापन करण्यासाठी विविध बैठकांमध्ये ती पीडिताकडे आकर्षित झाली. जानेवारी 2024मध्ये तिने विद्यार्थ्याला लैंगिक हावभावही केले.

पीडित मुलगा सुरवातीला अनिच्छुक असल्याने आणि तिला टाळू लागल्याने, शिक्षिकेने तिच्या एका महिला मैत्रिणीच्या माध्यमातून जी शाळेतील नाही तिच्या मदतीसाठी संपर्क साधला, असे एका पोलिस (Police) अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Mumbai teacher POCSO FIR
Mumbai police FIR child abuse : थरकाप उडवणारी घटना; बापानं पेटत्या सिगारेटचे चिमुकलीला दिले चटके

आरोपीच्या मैत्रिणीने पीडित विद्यार्थ्याला, असे सांगितले की तो आणि शिक्षक एकमेकांसाठी बनले आहेत. त्यानंतर विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला. यानंतर शिक्षिकेने पीडित विद्यार्थ्याला एका निर्जन स्थळी नेले. तिथे शिक्षिकेने विद्यार्थ्यावर अत्याचार केला. यानंर पीडित विद्यार्थी चिंतेखाली वावरू लागला. यानंर शिक्षिकेने चिंता वाटू नये म्हणून, पीडित विद्यार्थ्याला औषध देत होती, असे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.

Mumbai teacher POCSO FIR
BJP Politics : BJP ने जाहीर केले 9 राज्यांचे कारभारी! 20 प्रदेशाध्यक्ष बदलणार

चौकशीसाठी वाहन जप्त करण्यात आले आहे. शिक्षिका पीडित विद्यार्थ्याला दारू देखील पाजत असे आणि नंतर त्याला दक्षिण मुंबईतील आणि विमानतळाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायची, जिथे ती त्याला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असे, असे देखील पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यानंतर पीडित विद्यार्थी कुटुंबियांशी व्यवस्थित वागत नव्हता. कुटुंबियांनी हा बदल पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. कुटुंबाने विश्वासात घेतल्यावर त्याने सर्व हकिगत सांगितली. पीडित विद्यार्थी शाळेतून बारावी होणार असल्याने कुटुंबाने संयमाने घेतले. संबंधित शिक्षिकेला तंबी दिली. यानंतर पीडित विद्यार्थी बारावी पास झाला अन् त्याने शाळा सोडली.

परंतु, पीडित विद्यार्थ्याने शाळा सोडली, तरी संबंधित शिक्षिकाने पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. शिक्षिकेने तिच्या एका घरगुती कर्मचाऱ्यामार्फत पीडित विद्यार्थ्याशी संपर्क साधला. यावेळी पीडिताने शिक्षिका संपर्क साधत असल्याची माहिती कुटुंबाला दिली. यानंतर पीडिताच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या कलम चार (लिंगभेदक लैंगिक अत्याचार), सहा (तीव्र लैंगिक अत्याचार) आणि 17 (गुन्ह्यांचे निर्मूलन), तसेच आयपीसी आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, 2015च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com