विलासरावांचं 'ते' भाषण आज गाजतंय! अशोक चव्हाणांचा विरोधकांना सूचक इशारा

चव्हाणांनी ट्विटरवर या भाषणाचा व्हि़डीओ पोस्ट केला आहे.
Vilasrao Deshmukh, Ashok Chavan
Vilasrao Deshmukh, Ashok ChavanSarkarnama

मुंबई : दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारं तडफदार भाषण आज अचानक सोशल मीडियात व्हायरल होऊ लागलं आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेतृत्वावरून टीका-टिपण्णी केली जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही बुधवारी युपीए वगैरे काही नाही, असं म्हणत काँग्रेसला वगळून आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत.

राज्याचे मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीच हे भाषण ट्विटरवर पोस्ट केलं आहे. याचं कारणही त्यांनीच सांगितलं आहे. अलीकडे काँग्रेसबाबत काही मंडळी़ंना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमिवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. 'काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही,' असं वक्तव्य विलासराव देशमुख यांनी भाषणात केलेलं आहे.

Vilasrao Deshmukh, Ashok Chavan
गुजरात दंगलीवेळी कुणाचं सरकार? बारावी परिक्षेतील प्रश्न अन् मागावी लागली माफी

त्याचप्रमाणे या मार्गाने जे येतील त्यांना बरोबर घेऊन, जे येणार नाहीत, त्यांना बाजूला सोडून. गरिबांचा, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा काँग्रेसचा विचार आहे. एवढं मोठं पाठबळ असताना, एवढी मोठी वैचारिक शिदोरी असताना कुणाला घाबरण्याचं कसलंही कारण नाही. उजळ माथ्याने लोकांपुढे जा आणि त्यांना सांगा, हे आम्ही केलं आहे आणि राहिलेलंही आम्हीच करणार, दुसरं कुणीही करू शकणार नाही, असंही विलासराव देशमुख आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना सांगताना दिसत आहेत.

चव्हाण यांनी पोस्ट केलेल्या या भाषणावरून आता राजकीय चर्चांना ऊत आला आहे. ममता बॅनर्जी यांना बुधवारी पत्रकार परिषदेत आपण कॉंग्रेसला वगळून आघाडी तयार करणार का असे विचारले असता त्या म्हणाल्या होत्या की, देशाच्या जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी भाजपच्या विरोधात ही लढाई सुरु केली जाणार आहे. आता युपीए वैगेरे काही नाही, जे सोबत येतील त्या सर्वांना आम्ही सोबत घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ममतांच्या या वक्तव्याचा काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार समाचार घेतला आहे. काँग्रेसला वगळून विरोधकांना एकत्र आणणं शक्यच नसल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. ममतांनी मुंबई केवळ राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतली. यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. अशोक चव्हाण यांनीही हे ट्विट करत ममतांसह शिवेसना व राष्ट्रवादीलाही सूचक इशारा दिल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com