प्रभाकरची पुन्हा एसआयटी चौकशी

प्रभाकरने शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणात वानखेडे यांना ८ कोटी दिले जाणार होते. असा आरोप केला होता.
Prabhakr Sail
Prabhakr Sail
Published on
Updated on

मुंबई: कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी NCBचा प्रमुख साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याची गुरुवारी (११ नोव्हेंबर) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) विशेष तपास पथकाने (SIT) चौकशी केली. प्रभाकरसोबत त्याचे वकील हेमंत इंगळे होते. जवळपास चार तास प्रभाकरची चौकशी करण्यात आली. प्रभाकर साईलने आपल्या विधानांमध्ये कोणताही बदल केला नसल्याचे यावेळी वकील हेंमत इंगळे यांनी यावेळी सांगितले.

Prabhakr Sail
परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यासाठी CIDच्या हालचाली सुरु

बऱ्याच दिवसांनंतर मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी प्रभाकर साईल एनसीबीच्या ऑपरेशन टीमसमोर हजर झाला. प्रभाकर साईलने मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर ८ कोटींच्या लाचेचे आरोप केले होते. प्रभाकरने 3 ऑक्टोबर रोजी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणात वानखेडे यांना ८ कोटी दिले जाणार होते. असा आरोप केला होता.

प्रभाकरच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनीही एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कारवाईवर टिकेचा भडीमार सुरू केला. कालांतराने या गुन्ह्याच्या तपासासाठी दिल्लीहून विशेष NCB ची टिम NCBचे उपमहासंचालक संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली 5 नोव्हेंबर रोजी एसआयटीची स्थापना करण्यात आली.

एसआयटीला 'पंच' प्रभाकर (साक्षीदार)ची स्टेटमेंटची पडताळणी करायची होती. प्रभाकरने एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले होते. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या सूचनेनुसार एनसीबी अधिकार्‍यांनी त्याच्याकडून कोऱ्या कागदांवर स्वाक्षरी घेतली होती. यासह प्रभाकरने एनसीबी आणि इतर काही लोकांवर गंभीर आरोप केले होते. या सर्व प्रकरणाची चौकशी आणि तपास करण्यासाठीच काल प्रभाकरला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com