Mumbai : "महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे, असा महाराष्ट्र कधी नव्हता," हे विधान सध्या ऐकू येत आहे. कुठला आमदार कुठल्या पक्षात जाईल, याचा काही नेम नाही, अशा परिस्थितीत राजकीय पक्षांच्या आमदारांच्या कामगिरीचे प्रगती पुस्तक हाती आले आहे. (praja foundation report maharashtra legislative session amin patel number one position)
यात काँग्रेस पक्षाचे आमदार अमीन पटेल यांनी पहिल्या तीनमध्ये, प्रथम क्रमांक (८२.८० टक्के) पटकावला आहे. तर शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार, प्रतोद सुनील प्रभू यांनी दुसरा क्रमांक (८१.३०) पटकावला आहे. भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांना तिसरा क्रमांक्रावर (७५.०५ टक्के) समाधान मानावे लागले आहे. पहिल्या तीन क्रमांकात राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष कुठेच नाही.
मागील दोन वर्षातील मुंबईतील विद्यमान आमदारांनी त्यांच्या संविधानात्मक आणि वैधानिक कर्तव्यांची पूर्तता कशी केली यांचे मूल्यमापन प्रजा फाऊंडेशनने प्रगती पुस्तकातून केले आहे. प्रजा फाऊंडेशनतर्फे दरवर्षी आमदारांच्या कामाचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. ‘मुंबईतील आमदारांचे प्रगती पुस्तक 2023’ काल (मंगळवारी) प्रकाशित करण्यात आले आहे. अधिवेशन कालावधीत आमदारांच्या कामगिरीबाबतचा हा अहवाल आहे.
यावर होते मु्ल्यामापन..
विधी मंडळाच्या अधिवेशनाच्या कामाकाजात सहभागी होऊन किती आमदारांनी नागरिकांच्या समस्यांवर विचारलेल्या प्रश्नांची संख्या, कामकाजात सहभागी होणे, अधिवेशनात सभागृहातील एकूण उपस्थिती किती आदींवर गुण देण्यात आले आहेत. आमदारांच्या संविधानात्मक आणि वैधानिक जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्यामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करून पहिल्या 3 श्रेणी पटकावणारे हे आमदार आहेत.
जनहिताच्या मुद्द्यांवर चर्चेची संधी कमी
३१ आमदारांचे प्रगती पुस्तक तयार केले आहे.सन २०११ ते २०२२ या विधीमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत ३४ टक्केने घट झाली आहे. मुंबईसाऱख्या शहरांमध्ये आणि राज्य विधीमंडळाचे कामकाजही पुरेसे दिवस चालत नसेल तिथे नागरिकांच्या समस्या आणि जनहिताचे प्रश्न मागेच पडणार हे त्यांच्या घटलेल्या संख्येवरून समोर आले आहे. कामकाजाचे दिवस कमी म्हणजे जनहिताच्या मुद्द्यांवर चर्चेची संधी कमी असेच दिसते. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची आणि पुरेसे दिवस अधिवेशन चालण्याची किती गरज आहे, हे यावरुन स्पष्ट होते.
शिंदे-ठाकरे गट, भाजप आमदार कुठे ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे काही आमदार काहीशा पिछाडीवर पडले आहेत. शिंदे गटातील आमदार हे १३ व्या क्रमांकानंतर आहेत, तर ठाकरे गटातील आमदार हे १९ व्या क्रमांकाच्या खाली आहेत. भाजपच्या काही आमदारांची कामगिरी यंदा घसरली आहे. ते ९ व्या क्रमांकानंतर आहेत.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.