प्राजक्ता माळीची थेट मुख्यमंत्र्यांना साद; लहान तोंडी मोठा घास, पण आता बोलायला हवे...

राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आला असल्याने हे निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. हीच संधी साधत अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) एका व्हिडीओद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच साद घातली आहे.
प्राजक्ता माळीची थेट मुख्यमंत्र्यांना साद; लहान तोंडी मोठा घास, पण आता बोलायला हवे...
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील कोरोना (Covid 19) संसर्गाच्या पार्श्वभुमीवर गेल्या दोन वर्षांपासून कडक निर्बंध लादण्यात आले होते. मात्र आता राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आला असल्याने हे निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. हीच संधी साधत अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) एका व्हिडीओद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच साद घातली आहे. शिवजयंतीला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिल्याने तिने एका व्हिडीओतून आपल्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवल्या आहेत. सोशल मिडीयावर तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने या व्हिडीओद्वारे राज्य सरकारला चित्रपटगृह १०० टक्के आसनक्षमतेने सुरु करा, यासाठी कळकळीची विनंती केली आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.' लहान तोंडी मोठा घास…पण आता बोलायला हवे. सर्व मराठी रसिक सुज्ञ आहेत, करोना नियमांचं पालन करून ते कलाकृतींचा आस्वाद घेतील अशी आम्हांला खात्री वाटते. तरी आमची विनंती विचारात घ्यावी, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. त्यासोबत तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही नाव या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

प्राजक्ता माळीची थेट मुख्यमंत्र्यांना साद; लहान तोंडी मोठा घास, पण आता बोलायला हवे...
गुजराती व्यावसायिकाचा देशातील २८ बँकांना चुना; २२,८४२ कोटींचा सर्वात मोठा फ्रॉड

प्राजक्ता माळी अभिनेत्रीसोबतच एक उत्कृष्ट नृत्यांगणा आणि सूत्रसंचालिका सुद्धा आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. विविध फोटो आणि व्हिडीओच्या माध्यामातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. येत्या १८ फेब्रुवारीला तिचा पावनखिंड हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

प्राजक्ता माळी नेमकं काय म्हणाली?

“नमस्कार, नुकताच आमच्या पावनखिंड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. सर्व मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. येत्या १८ फेब्रुवारीला 'पावनखिंड' चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटावरही प्रेक्षक मनापासून प्रेम करतील. पण आता सरकारलाच विनंती आहे की, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. सर्वच निर्बंध बऱ्यापैकी शिथील करण्यात आले आहेत. फक्त चित्रपटगृह आणि नाट्यगृहच ५० टक्के आसनक्षमतेने सुरु आहेत, असे का?''

'त्यामुळे आम्हा सर्व कलाकारांची राज्य सरकारला अशी नम्र विनंती आहे की, शिवजयंती तोंडावर आली आहे. त्या निमित्ताने सर्व शिवप्रेमींना, चित्रपट निर्मात्यांना, सर्व रंगकर्मींना १०० टक्के आसनक्षमतेने सर्व चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु झाली आहेत, ही आनंदाची बातमी द्याल. १०० टक्के आसनक्षमतेने चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु व्हावीत, अशी आम्ही आशा करतो. यामुळे आम्हा सर्व कलाकारांना आणि चित्रपट निर्मात्यांना खरच खूप फायदा होईल. राज्य सरकारला नम्र विनंती. त्यासोबत प्रेक्षकांनीही हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा.” असे प्राजक्ता माळीने या व्हिडीओत म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com