Prakash Ambedkar: औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या; आंबेडकरांच्या विधानानं खळबळ

Prakash Ambedkar Statement on Aurangzeb Tomb: 2026 साली होणाऱ्या निवडणुकीत भाजपा-आरएसएस औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहेत. होय तुम्ही खरं वाचलंय.
Prakash Ambedkar on Aurangzeb tomb controversy
Prakash Ambedkar on Aurangzeb tomb controversySarkarnama
Published on
Updated on

Aurangzeb Tomb Controversy: छावा चित्रपटानंतर औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) ही वादाचा विषय बनली आहे. ही कबर हटविण्याची मागणी अनेक राजकीय नेत्यांनी केली आहे.

या वादावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोशल मीडियावर केलेल्या विधानाची चर्चा सध्या सुरु आहे. आगामी निवडणुकीच्या प्रचारात भाजप 'औरंगजेबाची कबर'हा राजकीय मुद्या कसा कसा करणार याबाबत आंबेडकरांनी सांगितले आहे.

औरंग्याच्या कबरीवरुन राज्यात राजकारण पेटलं असताना प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या विधानामुळे या वादाला वेगळं वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या ट्विटमध्ये औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या होणार आहे, असं आंबेडकरांनी म्हटलंय आहे. भाजपा आणि आरएसएसला त्यांनी निशाणा साधला आहे.

Prakash Ambedkar on Aurangzeb tomb controversy
Bachchu Kadu: आमदारकी गेली पण हे पद राहणार! मुंबई कोर्टाकडून दिलासा

'ते औरंगजेबाला आगामी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा बनवत आहेत. औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या आहे. 2026 साली होणाऱ्या निवडणुकीत भाजपा-आरएसएस औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहेत. होय तुम्ही खरं वाचलंय. औरंगजेबाची कबर भविष्यातील अयोध्यासारखा मुद्दा होणार आहे. 2026 साली निवडणूक होणार आहे,' असे आंबेडकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नागपुरात झालेल्या हिंसाचारामागे फहीम खान असल्याचा दावा नागपूर पोलिसांनी केला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. फहीम खान याने लोकांना भडकवण्याचे काम केले. त्यानंतर ही हिंसा घडली. नागपूरमधील गणेशपेठ पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या तक्रारीमध्ये उघड झाले आहे.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. औरंगजेबाच्या थडग्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला.

परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी, लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आणि धार्मिक शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने जमावाने कुऱ्हाडी, दगड, काठ्या आणि इतर धोकादायक शस्त्रांचा वापर केला, असे पोलिसांकडील तक्रारीत म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com