Prakash Ambedkar News : महाविकास आघाडीचा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. महाराष्ट्रात वंचित आघाडीला जागा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. पण प्रकाश आंबेडकर यांची दुहेरी भूमिका समोर येताना दिसत आहे. एकीकडे महाविकास आणि इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा ते व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे इंडिया आघाडीविरोधात टीकादेखील करीत आहेत. त्यामुळे त्यांचा स्वभाव डबल ढोलकीसारखा तर नाही ना ? असा सवाल उपस्थित होतो.
बैठकीसाठी निमंत्रण...
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. कोणाला किती जागा द्यायच्या हे मागच्या बैठकीत ठरलं आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये आपला समावेश झाला पाहिजे, अशी इच्छा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर वारंवार व्यक्त करीत आहेत. मविआच्या मागील बैठकीचे त्यांना आमंत्रण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु जयंत पाटील यांनी त्यांना पाठवलेल्या निमंत्रणाच पत्र पाठवलं आहे.
आजदेखील महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी स्वतः मविआच्या नेत्यांनी त्यांना फोन करून आमंत्रण दिलं आहे. आज वंचितचे काही प्रतिनिधी या बैठकीसाठी उपस्थितदेखील राहणार आहेत. मात्र दुसरीकडे प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीबद्दल टीका करताना दिसत आहे. एकीकडे मविआ आणि इंडिया आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त करणारे आंबेडकर दुसरीकडे त्याच पक्षांवर टीका करत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'इंडिया' आघाडीसारखी 'मविआ'ची गत...
प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र दुसरीकडे ते याचं आघाडीवर टीका करत आहेत. सध्या इंडिया आघाडीमध्ये ताटातूट पाहायला मिळत आहे. मात्र, तशीच गत महाविकास आघाडीचीदेखील आहे, असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे.
जर येत्या 15 दिवसांत महाविकास आघाडीच्या पक्षांनी जागावाटपाचा निर्णय घेतला तर हे वाचतील. नाही तर यांचेही हाल इंडिया आघाडीसारखे होतील, असे वक्तव्य आंबेडकर यांनी केलं. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात इंडिया आघाडी तयार झाली होती. मात्र ती जेव्हा बनली तेव्हाच हे निश्चित होतं की ही तुटणार आहे, कारण याचा रिंगमास्टर पंतप्रधान नरेंद मोदी होते, असा आरोप आंबेडकर यांनी केला. त्यामुळे आंबेडकरांचा डबल ढोलकीचा स्वभाव दिसून येत आहे.
महाविकास आघाडीत समावेश होण्यासाठी वंचितचे प्रयत्न आता फळाला आले आहेत. उद्धव ठाकरे गटासोबत त्यांचा सलोखा अगोदरच झाला. आज 30 जानेवारी रोजी महाविकास आघाडीची बैठक होत आहे. काँग्रेसने वंचितला या बैठकीसाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यापूर्वीच आंबेडकर यांच्या बॉम्बने खळबळ उडाली आहे. हा दबावतंत्राचा भाग तर नाही ना, अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
(Edited by Amol Sutar)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.