Jayant Patil : जयंत पाटलांकडून नाराजांची मनधरणी, सांगलीत पडझड रोखण्याचा प्रयत्न

Political News : माजी नगरसेवक कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jayant Patil Vs Ajit Pawar
Jayant Patil Vs Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Sangali News : महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पकड सैल करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटातील अनेक मोहरे गळाला लावले. त्यामुळे जयंत पाटील यांना धक्का बसला. जयंतरावांनी नाराजांची मनधरणी करीत पडझड रोखण्याचा प्रयत्न सुरु केले आहेत. त्या संदर्भात दोन बैठका देखील झाल्या आहेत. त्यामुळे माजी नगरसेवक कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तर काही आमदारांना मंत्रीपदे मिळाली. त्यांनतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. शरद पवार व अजित पवार यांनी आपल्या गटाची ताकद वाढविण्यासाठी राज्यात मेळावे, सभा, बैठका सुरू केल्या. नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी देखील झाल्या.

Jayant Patil Vs Ajit Pawar
Bachchu Kadu News : आमदार बच्चू कडूंची स्टाईलच न्यारी..! दिव्यांगाच्या दुचाकीवरुन कार्यक्रमस्थळी आगमन...

राज्यातील या फुटीचा परिणाम सांगली ग्रामीण व शहरी भागात झाला. मनपा क्षेत्रातून माजी महापौर इद्रिस नायकवडी, दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे आदींनी अजित पवार गटात प्रवेश केला. या पदाधिकार्‍यांनी पहिला धक्का काही दिवसांपूर्वी दिला. माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक विष्णू माने यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याबरोबर 13 माजी नगरसेवक देखील दूरध्वनीवरून सहभागी होते.

महापालिका क्षेत्रात जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. महापालिकेच्या निवडणुका किमान वर्षभर लांबणीवर पडल्या आहेत. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे नाराजांची मनधरणी करून त्यांना प्रवेशापासून रोखणे आवश्यक आहे. यासाठी आ. जयंत पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. माजी महापौर इद्रिस नायकवडी हे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तर पद्माकर जगदाळे यांना महापालिका क्षेत्राचे अध्यक्षपद दिले आहे. माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची नुकतीच राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे हे तिघे स्वगृही परतण्याची शक्यता देखील कमी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक विष्णू माने आदी माजी नगरसेवकांसाठी आ. जयंत पाटील प्रयत्न करत आहेत. अद्याप या नगरसेवकांनी जाहीर प्रवेश केला नाही. त्यामुळे त्यांना थांबविणे शक्य आहे. शिवाय माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी माजी महापौर बागवान व स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश आवटी यांना अजित पवार गटात घेण्यास विरोध केला आहे. त्यामुळे बागवान यांचा प्रवेश थांबू शकतो. बागवान यांचा प्रवेश थांबला तर अनेक माजी नगरसेवक देखील थांबतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे आ. जयंत पाटील यांनी नाराजांची मनधरणी सुरू केली आहे.

सांगली शहरात राजारामबापू पाटील पूर्णाकृती अनावरणचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी या नाराजांना निमंत्रित केले होते. नाराज देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याच्या दुसर्‍या दिवशी आ. जयंत पाटील यांनी नाराजांबरोबर चर्चा केली. या नाराजांनी पक्षातील काही व्यक्तिंच्या तक्रारी आ. जयंत पाटील यांच्यासमोर मांडल्या. आ. पाटील यांनी पक्षात काही बदल करू, अशी ग्वाही देखील त्यांना दिली. शिवाय दुसर्‍या टप्प्यात पुन्हा चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी माजी नगरसेवकांनी होकार दिला आहे. त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश थांबणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Jayant Patil Vs Ajit Pawar
Manoj Jarange: रायगडावरून जरांगेंची मोठी घोषणा: मराठा आरक्षणानंतर 'या' समाजासाठी आता लढा उभारणार

5 फेब्रुवारीच्या अजितदादांच्या दौर्‍यात होणार स्पष्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) 5 फेब्रुवारीला सांगलीच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यांच्या दौर्‍याची जय्यत तयारी अजित गटाकडून सुरू झाली आहे. कुपवाड व सांगलीत त्यांचे कार्यक्रम होणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीतील अनेकांचे पक्ष प्रवेश होणार आहेत. या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दौर्‍यापूर्वी माजी नगरसेवकांची नाराजी दूर करून त्यांना राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) प्रवाहात आणण्यसाठी जयंत पाटील (Jaynat Patil) यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नाला यश येणार की नाही हे दि. 5 फेब्रुवारीच्या पवारांच्या दौर्‍यावेळी स्पष्ट होईल.

(Edited by Sachin Waghamare)

Jayant Patil Vs Ajit Pawar
मिटकरींचे 'ते' मत वैयक्तिक : दिलगिरी व्यक्त करत पाटील-मुंडेंनी संपवला विषय

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com