मुंबै बँकेत ६ महिन्यात सत्तांतर; भाजपच्या प्रविण दरेकरांचे अध्यक्षपदी पुनरागमन

Pravin Darekar | BJP | Mumbai Bank | उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिद्धार्थ कांबळे यांची निवड
Pravin Darekar Latest Marathi News
Pravin Darekar Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात सत्तांतर होताच त्याचा परिणाम मुंबई बँकेतील सत्तेवरही झाला आहे. अवघ्या ६ महिन्यात महाविकास आघाडीला धक्का देत भाजप (BJP) नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी बँकेच्या अध्यक्षपदी पुनरागमन केले आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिद्धार्थ कांबळे यांची निवड झालेली आहे. (Mumbai District Central Cooperative Bank News) आज बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बिनविरोध निवड पार पडली.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय म्हणून २० संचालक निवडून आले होते. यात शिवसेना +राष्ट्रवादी काँग्रेसचे १० तर भाजपचे १० संचालक होते. प्रविण दरेकर हे दोन प्रवर्गातून निवडून आले होते. मात्र त्यानंतर तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या निवडणुकीत लक्ष घालून राज्यातील सत्तेप्रमाणे मुंबई बँकेतही महाविकास आघाडीची स्वतंत्र चूल तयार केली.

पवार-ठाकरे जोडीने भाजपचेच एक मत फोडून भाजपच्या प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना चकवा दिला आणि त्यावेळी अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे विजयी झाले होते. कांबळे यांना ११ तर प्रसाद लाड यांना ९ मतं मिळाली होती. उपाध्यक्षपदी मात्र भाजपचे विठ्ठल भोसले निवडून आले होते. मात्र मागील आठवड्यात कांबळे आणि भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पुन्हा एकदा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता.

गतवेळी प्रविण दरेकर अपात्र ठरले होते :

गत निवडणुकीत प्रविण दरेकर मजूर व नागरी बॅंक या प्रवर्गातून निवडून आले होते. मात्र त्यांना मजूर प्रवर्गातून अपात्र ठरविण्यात आले होते. शिवाय त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मुळात आमदार व विरोधी पक्षनेता म्हणून आर्थिक लाभ घेत असताना ती व्यक्ती ‘मजूर’ असू शकत नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतंत्र व्यावसायिक असे नमूद केलेले असताना ती व्यक्ती मजूर कशी होऊ शकते? त्यामुळेच दरेकर यांना जिल्हा सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी अपात्र घोषित केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com