Video Bacchu Kadu Politics : ...तर आम्ही स्वतंत्र; आमदार बच्चू कडू यांनी महायुतीची धाकधूक वाढवली!

Assembly session 2024 : शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्त आणि दिव्यांग यांच्या मुद्द्यांवरून आमदार बच्चू कडू भाजप महायुती सरकारवर नाराज आहे. मुख्यमंत्र्यांशी यावर बोलणार असून
bacchu kadu devendra fadnavis eknath shinde ajit pawar
bacchu kadu devendra fadnavis eknath shinde ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : प्रहारचे आमदार बच्चू कडू शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त आणि मजूर यांच्या मुद्द्यांवर आक्रमक झालेत. महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. आमदार बच्चू कडू यांनी एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असून यावेळी मुख्यमंत्री कसा प्रतिसाद देतात ते पाहून निर्णय घेऊ, असे सांगितले.

तिथे पटले नाहीतर पुढच्या निर्णयासाठी शेतकरी आणि लोकांसमोर जाणार.शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्त आणि दिव्यांगसंदर्भातील आमच्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय नाही झालास, तर बच्चू कडू स्वतंत्र लढेल. तिसऱ्या आघाडीसंदर्भात आता बोलणार नाही, असे म्हणत पुढच्या राजकारणाची दिशा गुलदस्त्यात ठेवत, आमदार बच्चू कडू यांनी विरोधकांची धाकधूक वाढवली.

आमदार बच्चू कडू महायुतीमध्ये नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या. यावर आमदार बच्चू कडू यांनी स्वतः भूमिका मांडली. शेतकरी, कष्टकरी, मजूर आणि दिव्यांग यांच्या समस्यांवर काही मुद्दे मांडत होतो. त्यासाठी 10 ते 15 आमदार एकत्र होते. परंतु सत्ताधाऱ्यांकडे यावर चर्चेसाठी वेळ नाही.

काँग्रेसने जे केले, तेच भाजप महायुती सरकार करत आहे, असे म्हणून आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी आम्ही लोकांमध्ये जावू. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेऊ. तिथे आमच्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय नाही झाला, तर आम्ही स्वतंत्र निर्णय घेऊ, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.

bacchu kadu devendra fadnavis eknath shinde ajit pawar
Raghunath Patil: 'मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी'; रघुनाथदादांनी मुख्यमंत्र्यांना काढला चिमटा

आम्ही निवडून आल्यानंतर मंत्रिपदाची मागणी करत नाही. मंत्रीपद मागणार देखील नाही. परंतु शेतकऱ्यांच्या विषयावर सरकारने काही निर्णय घेणे गरजेचे आहे. रविकांत तुपकर, संभाजीराजे आणि आप यांच्या एका कार्यक्रमाला आम्ही एकत्र होतो. तिथे शेतकऱ्यांसाठी एकत्र लढले पाहिजे यावर चर्चा झाली. परंतु तिसऱ्या आघाडी संदर्भात पूर्णपणे, अशी चर्चा झाली नाही. मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आम्ही पूर्णपणे स्वतंत्र लढू, असे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी म्हटले.

महाविकास आघाडीने ऑफर दिल्यास

महाविकास आघाडीने ऑफर दिल्यास त्यांच्याकडे जाणार का? यावर आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसने त्यांच्या सरकारच्या काळात तेच केले आणि आता भाजप महायुती सरकार पण तेच करत आहे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही. दुधाला भाव मिळत नाही. कांद्याची परिस्थिती सर्वांना माहीत आहे. शेतकऱ्याने कष्टकऱ्यांना कधी बोनस मिळाला नाही. त्यांना बोनस तरी द्या. आर्थिक विषमता वाढली आहे. जातीय तेढ वाढली आहे. ती मिटवण्यासाठी सरकार कोठेच काम करताना दिसत नाही, अशी नाराजे आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

bacchu kadu devendra fadnavis eknath shinde ajit pawar
Assembly Session : भास्कर जाधवांनी खिंडीत गाठलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या मदतीला आशिष शेलार धावले

योजनांच्या माध्यमातून पक्षांचा प्रचार नको

भाजप महायुती सरकारने राज्यात लागू केलेल्या योजनांच्या जाहिरातीसाठी 5 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे यावरही आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. योजनांचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. परंतु त्यातून पक्षाचा प्रचार होणार असेल, तर ते चुकीचे आहे, असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com