Narendra Modi On NCP: राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या भ्रष्ट्राचाराचा आरोप; पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच थेट बोलले

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात देशभरातील तब्बल 15 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या 15 विरोधी पक्षांची 23 जूनला महत्वाची बैठक बिहारच्या पटनामध्ये पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुका भाजपविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्रीत लढण्यावर एकमत झालं. पण विरोधी पक्षांच्या या बैठकीनंतर भाजपने जोरदार टीका केली आहे.

आता या पार्श्वभूमीवरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. "राष्ट्रवादी पक्षावर तब्बल 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचाराचा आरोप आहे", असं पंतप्रधान मोदी म्हणाले. मोदींनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीवर थेट पणे बोलत भ्रष्ट्राचाराचा गंभीर आरोप केल्यामुळे यावर आता शरद पवार काय प्रतिउत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Prime Minister Narendra Modi
Bihar Opposition Meet: भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांची रणनीती ठरली; आजच्या बैठकीत काय ठरलं? नितीश कुमारांनी सांगितलं

पंतप्रधान मोदी यांनी आज भाजपच्या मेळाव्यात बोलताना काँग्रेस पक्ष, समाजवादी, बीआरएस,आरजेडी, राष्ट्रवादी, नॅशनल कॉन्फरन्स या पक्षासह अजून काही विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच हे सर्व पक्ष परिवार पार्टी असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

"जर तुम्हाला (जनतेला) गांधी परिवाराच्या मुलाचा (राहुल गांधी) आणि मुलीचा (प्रियंका गांधी) यांचा विकास करायचा असेल तर काँग्रेस पक्षाला मतदान द्या. जर मुलायम सिंह यादव यांच्या मुलाचं भलं करायचं असेल तर समाजवादी पक्षाला मतदान द्या. जर लालू प्रसाद यादव यांच्या परिवाराचं भलं करायचं असेल तर 'आरजेडी'ला मतदान द्या".

"जर तुम्हाला शरद पवार यांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मतदान करा. जर ओमर अब्दुल्ला यांच्या परिवाराचं भलं करायचं असेल तर 'नॅशनल कॉन्फरन्स'ला मतदान द्या. जर के चंद्रशेखर राव यांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर 'बीआरएस' पार्टीला मतदान द्या. मात्र, जर तुम्हाला तुमच्या मुला-मुलींचं भलं करायचं असेल तर भाजला मतदान द्या", असं म्हणत यावेळी विरोधकांवर पंतप्रधान मोदी यांनी जोरदार हल्लाबोल केला.

Prime Minister Narendra Modi
Patna Opposition Meeting : मोदींचा विजयाचा वारु रोखण्यासाठी विरोधकांनी ठरवली ही रणनीती..

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पहिल्यांदाच थेट हल्लाबोल करत गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान मोदी यांना काय प्रतिउत्तर देतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com