Ajit Pawar News: पृथ्वीराजबाबांना आमदारकीचा अनुभवच नव्हता; अजितदादांनी थेट सांगितले, म्हणाले,....

Congress - NCP : कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारकाळात राज्यात काही घडामोडी घडल्या होत्या, या घडामोडींवर भाष्य केलं.
Ajit Pawar | Pruthviraj Chavan
Ajit Pawar | Pruthviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : ''कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र असताना काही असे प्रसंग आमच्या समोर निर्माण झाले की, आम्ही एकमेकांना साथ देण्याऐवजी त्यावेळेच्या काहींना आमचे विरोधक जास्त जवळचे वाटले आणि आम्ही राष्ट्रवादीवाले जरा लांबचे वाटलो. त्याचाच फटका नंतर सरकार पडायला झाला, अशी भावना विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारकाळात राज्यात काही घडामोडी घडल्या होत्या, या घडामोडींवर भाष्य केलं. ''माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आमदार म्हणुन काम केलं नव्हतं, त्यामुळे मागच्या काही वर्षात आम्ही लोक काम करत असताना आम्हाला आमच्या विरोधकांनी परंतु त्यावेळच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशी वागणूक दिली ती त्यांनी बघितली नव्हती. ''

Ajit Pawar | Pruthviraj Chavan
Ajit Pawar News: सत्तांतराबाबत अजितदादांचा गौप्यस्फोट : मी उद्धवजींना सावध केलं होतं,ते म्हणाले, मी शिंदेशी बोलेन पण..

त्यांना आमदारकीचा अजिबात अनुभव नव्हता. इथल्या मंत्रिमंडळाचा अजिबात अनुभव नव्हता. ते दिल्लीत पंतप्रधानांशी संबंधित एका विभागाचे काम बघत होते. निश्चितच राज्याचं राजकारण आणि दिल्लीच्या राजकारणात मोठा फरक पडतो. दुर्दैवाने त्यावेळी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र असताना काही असे प्रसंग आमच्या समोर निर्माण झाले की आम्ही एकमेकांना साथ देण्याऐवजी त्यावेळेच्या काहींना आमचे विरोधक जास्त जवळचे वाटले. आम्ही राष्ट्रवादीवाले जरा लांबचे वाटलो. त्याचाच फटका नंतर सरकार पडायला झाला.'' असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

Ajit Pawar | Pruthviraj Chavan
Ajit Pawar On VBA Alliance: राज्यात वंचितची ताकद मोठी; अजित पवारांनी केलं मान्य, म्हणाले, 'माझी हरकत नाही...'

याचवेळी वेळी त्यांनी शिवसेनेतील फोडाफोडीच्या राजकारणावरुनही भाजपवर निशाणा साधला आहे. आजही जनतेच्या मनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सहानुभुती आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्षे काम करत असताना त्यांना बाजुला करुन त्यांच्यातील आमदारांची फोडाफोडी करुन गलिच्छ राजकारण करण्याचं पाप ज्यांनी कोणी केलं, त्यांना महाराष्ट्रातली जनता असं उघडपणे बोलून दाखवत नाही. लोक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतील पण मतदान करताना ते बरोबरच्या ठिकाणीच बटण दाबतील, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com