Maharashtra Political News : खासदार श्रीनिवास पाटील यांनी आजारपणाचे कारण देत साताऱ्यातून लोकसभा लढवण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर पाटलांच्या Shrinivas Patil मुलासह काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाचीही चर्चा झाली. मात्र दोघांनाही उमेदवारी न मिळता साताऱ्यातून माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाणांना फक्त आताच नाही तर यापूर्वीही खासदारकीपासून हुलकावणी देण्यात आली आहे. याबाबत खुद्द चव्हाणांनीच एका मुलाखतीत सांगितले आहे. Prithviraj Chavan react on Sharad Pawar over Contestant of Satara.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सातारा Satara ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे तेथून खासदार श्रीनिवास पाटील यांचे नाव घेतले जात होते. त्यांनी मात्र निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सारंग पाटलांचे नाव पुढे आले. तसेच पृथ्वीराज चव्हाणांनी साताऱ्यातून लोकसभा लढवावी, अशी गळ खुद्द पवारांनी घातल्याची चर्चा झाली. मात्र येथून सध्या शशिकांत शिंदे Shashikant Shinde हे उमेदवार आहेत. मात्र पडद्याआड काय घडले याबाबत चव्हाणांनी स्पष्टपणे सांगितले.
चव्हाण म्हणाले, श्रीनिवास पाटलांनी नकार दिल्यानंतर पवारांनी Sharad Pawar मला साताऱ्यातून लोकसभा लढवण्यासाठी सांगतिले होते. त्यानंतर त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कराड येथील माझ्या घरी आले. त्यांनी तुम्ही साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवा, पण तुतारी चिन्हावर, असे सांगितले. त्याला मात्र मी नकार दिला. त्यानंतर साताऱ्यातून शशिकांत शिंदेंचे नाव जाहीर झाले. त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व स्तरावर काम केले जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, पवारांनी 2019 मध्येही लोकसभेची ऑफर दिल्याचे चव्हाणांनी Prithviraj Chavan सांगितले. खासदार उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिला आणि भाजपकडून त्यांनी पोटनिवडणूक लढवली. त्यावेळी पवारांनी मला फोन करून पोटनिवडणूक लढवण्यास सांगितले. त्यावेळी त्यांना पक्ष आणि चिन्हाबाबत विचारले. त्यावर त्यांनी तुम्ही काँग्रेसकडूनच निवडणूक लढवा. त्याबाबत काँग्रेसश्रेष्ठींशी चर्चा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मलाही वरीष्ठांकडून ग्रीन सिग्नल मिळाला. यानंतर पवारांचा फोन आला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांत तुमच्या नावाबाबत एकमत होत नसल्याची माहिती दिली, असेही चव्हाणांनी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.