खासगी रूग्णालयांनी तात्काळ आयसीयू बेड वाढवा  : हसन मुश्रीफ 

कोकण, सांगली आणि कर्नाटकातूनही कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने प्रत्येक दवाखान्यात अधिकाऱ्यांची नेमणूक करून सर्व लोकांना बेड उपलब्ध होतील, याबाबत दक्षता घेणे अत्यावश्‍यक असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.
NCP Minister Hasan Mushrif
NCP Minister Hasan Mushrif

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील खासगी दवाखान्यांनी आयसीयू बेड व कोरोना बेडची संख्या तात्काळ वाढवावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. महापालिका आयुक्तांनीही आपत्कालीन परिस्थितीच्या कायद्याचा अभ्यास करून अशा वाढीव सुविधा करण्याचे आदेश द्यावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

 कोरोना महामारीच्या संदर्भाने या दवाखान्याबद्दल काही कमी-अधिक तक्रारी असतीलही. तरीसुद्धा कोविडबाबत त्यांनी केलेले काम चांगले आहे. ते चांगले काम करीत आहेत, असे स्पष्ट करून मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या वाढतच चाललेल्या संसर्गामूळे कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषता कोल्हापूर शहरातील खासगी दवाखान्यावरील ताण वाढत चालला आहे. याची आम्हाला कल्पना आहे.

जिल्ह्यातील रुग्णांकडे ज्यांच्या खिशाला परवडतील असे पैसे आहेत, ते खाजगी दवाखान्यात ॲडमिट होण्याचा आग्रह धरतात. तसेच ज्यांना लक्षणे नाहीत आणि सरकारी दवाखान्यामध्ये जाण्याची इच्छा नाही, असे लोकही खाजगी दवाखान्यांमध्ये जाण्याचा आग्रह धरतात. याशिवाय कोकण, सांगली आणि कर्नाटकातूनही कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने प्रत्येक दवाखान्यात अधिकाऱ्यांची नेमणूक करून सर्व लोकांना बेड उपलब्ध होतील, याबाबत दक्षता घेणे अत्यावश्‍यक असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

ऐपत असणाऱ्यांची हॉटेलमध्येच व्यवस्था करा...

ज्यांना लक्षणे नाहीत परंतु खिशात पैसे आहेत, असे लोक खाजगी दवाखान्यात बेडची मागणी करतात व ही सुविधा वापरतात. त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या व ज्यांना खरोखरच बेडची गरज आहे, अशा लोकांना उपचारांपासून वंचित राहावे लागते. खाजगी दवाखान्यांना माझी विनंती आहे, कि अशा दवाखान्यांनी रुग्णांना हॉटेलची व्यवस्था करावी. त्यांना हॉटेलमध्येच उपचार द्यावेत. यातून अत्यावश्‍यक रुग्णांना बेड कसे मिळतील, यासाठी महापालिका आयुक्तांनी सक्षम व गतिमान यंत्रणा तयार करावी, असेही श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com