PDCC Bank : अजित पवारांची महत्वाकांक्षी कर्ज योजना सुरूच राहणार की बंद होणार ?

PDCC Bank : जिल्हा बॅंकांनी आपापल्या सभासदांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज हे शून्य टक्के व्याजाने देण्याची योजना राज्यात पहिल्यांदा सुरु केली होती.
 PDCC Bank
PDCC Bank sarkarnama

पुणे : जिल्हा बॅंकेची १०५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Pune District Bank) शुक्रवारी (ता.३०) दुपारी पुण्यातील अल्पबचत भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत दोन वर्षांपूर्वी सुरु केलेल्या पीक योजनेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादी नेते, विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या महत्वाकांक्षी कर्ज योजनेचे काय होणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने देण्याबाबतची दोन वर्षांपूर्वी सुरु केलेली योजना केंद्र सरकारमुळे गोत्यात आली आहे. त्यामुळे ही योजना गुंडाळली जाणार, अशी चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे. त्यामुळे या योजनेचे काय होणार, याचा सोक्षमोक्ष हा या सर्वसाधारण सभेत होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे डोळे लागले आहेत.

 PDCC Bank
Rashmi Thackeray : अरेरे..रश्मी वहिनींचा केविलवाणा प्रयत्न ; शिंदे गटाचा टोला ; दोन्ही गट आमने-सामने

राज्यातील पुणे व सातारा या दोन जिल्हा बॅंकांनी आपापल्या सभासदांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज हे शून्य टक्के व्याजाने देण्याची योजना राज्यात पहिल्यांदा सुरु केली होती. या दोन्ही बॅंकांनी सुमारे दीड दशक या योजनेची अंमलबजावणी केल्यानंतर हीच योजना संपूर्ण राज्यभर लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतला होता.

राज्यातील सर्व जिल्हा बॅंकांनी ही योजना सुरु केल्यानंतर, पुणे व सातारा या दोन जिल्हा बॅंकांनी त्यापुढे पाऊल टाकत, पाच लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज हे शून्य टक्के व्याजाने देण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार मागील दोन वर्षांपासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने पीककर्जाच्या व्याज सवलत परताव्यात अर्ध्या टक्क्याने कपात केली आहे. केंद्र सरकारच्या या कपातीमुळे आधीच तीन लाख रुपयांपर्यंतची शून्य टक्के पीककर्जाची योजना गोत्यात आली आहे. त्यामुळे थीन लाख रुपयांपर्यंतचे तरी कर्ज शून्य टक्क्याने मिळणार की नाही, याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम किमान जिल्हा बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दूर होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com