'३१ मे पर्यंत मराठी पाट्या लावा, अन्यथा एका कामगारामागे मोजावे लागणार हजार रूपये'

सर्वच दुकानावरील पाट्या या मराठीतच लावाव्या लागणार आहेत.
Marathi language latest news
Marathi language latest newsSarkarnama

मुंबई : गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) दुकाने आणि आस्थापनावर मराठीत फलक (Marathi language) लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. येत्या ३१ मे पर्यंत दुकाने, आस्थापना आणि कार्यालयांवरील नाम फलक मराठीत न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे निर्देश मुंबई महापालिकेने (BMC) दिले आहेत. (Marathi language latest news)

Marathi language latest news
राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी... रामदास आठवले

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना सुधारणा अधिनियम 2022 मधील कलम 36 'क' (1) कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम 7 नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. या नियमाचं पालन न करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या की नाही? याबाबत पालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाकडून प्रत्येक वॉर्डमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. चौकशीदरम्यान मराठी पाटी लावण्यास नकार दिल्यास थेट न्यायालयात खटला दाखल केला जाईल तर, न्यायालयीन कारवाई टाळायची असल्यास दंड भरावा लागणार आहे. यामध्ये एका कामगारामागे एक हजार वा कायद्यातील दंडानुसार दंड आकारण्यात येणार असल्याचे निर्देश मुंबई महापालिकेकडून देण्यात आले आहे.

Marathi language latest news
हिंदी भाषेविषयी बोलताना शिक्षणमंत्र्यांची जीभ घसरली; हिंदी भाषिक आमच्याकडे...

दरम्यान, दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याच्या तक्रारी राज्य सरकारला प्राप्त झाल्या होत्या. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात बैठक घेत व कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमात सुधारणा करण्यात आली होती.

यामुळे आता बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेठ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकानावरील पाट्या या मराठीतच लावाव्या लागणार आहेत. मराठीत देवनागरी लिपीतील अक्षरे हे दुसऱ्या भाषेच्या अक्षरांपेक्षा मोठी असावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com