Maharashtra Government : महसूल अधिकाऱ्यांना विखे पाटलांचा दणका; बदलीच्या ठिकाणी रुजू न झालेल्या ११ अधिकाऱ्यांचे निलंबन

Maharashtra Revenue Department : विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या सात तहसीलदारांना निलंबित केले आहे.
Maharashtra Revenue Department
Maharashtra Revenue Department Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : सरकारी नोकरी म्हणजे आपली सासुरवाडी समजणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. बदली होऊन दोन महिन्यांनंतरही रुजू न झालेल्या ११ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबन झालेल्यांमध्ये महसूल विभागातील आठ तहसीलदार व चार उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे राज्यातील प्रशासनात खळबळ उडाली आहे.

बदली झालेल्या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून अनेक महसूल अधिकारी अद्यापही रुजू झाले नाहीत, अशा सर्व अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करत विभागीय आयुक्त पातळीवर चौकशी करण्याचे आदेश राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. त्यांची अंमलबजावणी आज करण्यात आली आहे.

Maharashtra Revenue Department
Supriya Sule News : महिला आरक्षण अंमलबजावणी कधी? सुप्रिया सुळेंना शंका; म्हणाल्या, हा तर पोस्ट-डेटेड चेक...

आपल्या इच्छेप्रमाणे पोस्टिंग न मिळालेले हे अधिकारी दोन महिन्यांपासून मंत्रालय, नेत्यांचे उंबरठे झिजवत होते, तर दुसरीकडे बदलीच्या ठिकाणी अधिकारी रुजू न झाल्याने राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कमी पडत होती. ३० पैकी ११ अधिकारी हे बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नव्हते. अशा अधिकाऱ्यांना महसूल विभागाने इंगा दाखवला आहे.

विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या सात तहसीलदारांना निलंबित केले आहे. यामध्ये पल्लवी तभाने (वर्धा), बालाजी सूर्यवंशी (अपर तहसीलदार, नागपूर), सरेंद्र दांडेकर (धानोरा, गडचिरोली), बी. जे. गोरे (एटपल्ली, गडचिरोली), सुनंदा भोसले (नागपूर), विनायक थविल (वडसादेसागंज, गडचिरोली), तर नाशिक विभागातील सुचित्रा पाटील (करमणूक शुल्क अधिकारी, नाशिक) यांचा समावेश आहे.

यवतमाळ जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी इब्राहिम चौधरी, अहमदनगर जिल्ह्यात बदली झालेले अभयसिंह मोहिते यांचेही निलंबन करण्यात आले आहे. दोन जिल्हाधिकाऱ्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत.

Edited By : Mangesh Mahale

Maharashtra Revenue Department
Maharashtra Drought : धक्कादायक : दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली! अपुरे पीककर्ज वाटप केल्यामुळे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com