Maharashtra Political News : भारत जोडो यात्रा कुणा एका व्यक्तिविरोधात नाही. ही यात्रा कुणा एका पक्षाविरोधात नाही. ही यात्रा एका शक्तीविरोधात आहे. महाराष्ट्रातील एक नेता रडत रडत म्हणाला की माझ्यात या शक्तिविरोधात लढण्याची हिम्मत नाही. मी काँग्रेस पक्ष सोडतो, असा गौप्यस्फोट करत काँग्रेसनेते राहुल गांधींनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते सध्याचे भाजपकडून राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर टीका केली. (Rahul Gandhi On Ashok Chavan)
काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप झाला. त्यावेळी इंडिया आघाडीतील देशभरातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. त्यावेळी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) देशात सुरू असलेल्या दहशतीच्या वातावरणावर बोलताना भाजपच्या राजकारणावर सडकून टीका केली. भाजपच्या वतीने केंद्रीय संस्थांचा गैरवापर वाढला आहे. या माध्यमातून देशभरातील विरोधकांना संपवण्याचे काम सुरू आहे. या शक्तिविरोधात आपल्याला लढायचे आहे, असे आवाहन गांधींनी केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेस पक्ष सोडण्यापूर्वी अशोक चव्हाण रडण्याचे कारणही राहुल गांधींनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, आम्ही भाजप किंवा (Narendra Modi) नरेंद्र मोदींविरोधात लढत नाही. एका व्यक्तीचा चेहरासमोर केला जात आहे. हिंदू धर्मात एक शब्द आहे तो म्हणजे शक्ती. आम्ही त्या शक्तिविरोधात लढत आहोत. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. ईडी, सीबीआय, आयटी या संस्थात आहे. राज्यातील एक मोठा नेता काँग्रेस पक्ष सोडतात. ते सोनिया गांधीसमोर (Sonia Gandhi) बसून रडतात. रडता-रडता म्हणतात, की मला लाज वाटते. माझ्यात या लोकांविरोधात, या शक्तिविरोधात लढण्याची हिम्मत नाही, असे म्हणत राहुल यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला.
अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले हे स्पष्ट केले मग मला एक सांगा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस उगीच फुटली का, असा प्रश्नही उपस्थित केला. राज्यात फक्त अशोक चव्हाण एकटेच नाहीत तर त्यांच्यासारखे हजारो लोक आहेत. त्यांना विविध मार्गांनी भिती दाखवण्यात आली. शिवसेनेतील गेलेले लोक, राष्ट्रवादीचे लोक असेच भाजपात गेले का? तर नाही! ज्या शक्तीबाबत मी बोलतोय ती शक्ती त्यांच्या मानगुटीवर बसवून त्यांना भाजपात नेण्यात आले, असेही राहुल गांधींनी यावेळी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.