Rahul Narwekar News: खासगी रुग्णालयासाठी धोक्याची घंटा; मोफत उपचारांच्या खाटांची माहिती देणारे ॲप तयार होणार !

Charitable Hospital : गरीब रुग्णांना सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची, कार्यप्रणालीची माहिती जनतेला तातडीने करुन देण्यात यावी.
Rahul Narwekar
Rahul NarwekarSarkarnama

Rahul Narwekar News : आर्थिक खर्चांमुळे जेरीस येणाऱ्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी राज्यातील तब्बल ४०० धर्मादाय रुग्णालयांमध्ये त्यांना विनाशुल्क वा सवलतीच्या दरामध्ये उपचार मिळणे सहजशक्य आहे. त्यासाठी केवळ दारिद्ररेषेखाली असल्याचे पिवळे रेशनकार्ड किंवा तहसीलदारांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. मात्र याबाबतची माहिती त्यांच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचत नसल्यामुळे आणि त्यांची कागदपत्रासाठी अडवणूक होत असल्याने गरजूंना योग्यवेळी वैद्यकीय मदत मिळत नसल्याचे समोर आले आहे.रुग्णांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार तक्रारी विधिमंडळात सातत्याने मांडल्या जात आहेत.

Rahul Narwekar
Bhaskar Jadhav : ठाकरेंची तोफ भास्कर जाधव विधानभवनाच्या पाऱ्यांवर नमस्कार करुन निघाले; पुन्हा येणार नाही?

या विषयी सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत( Tanaji Sawant), विधानसभा सदस्य तसेच सार्वजनिक आरोग्य, विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि धर्मादाय आयुक्त यांच्या उपस्थितीत आज (२१ मार्च) बैठक घेण्यात आली. या बैठकीत, गरीब रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासंदर्भात होणारी अडचण आणि यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत राज्यातील चारशे रुग्णालयांकडून दुर्बल घटकांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारे दिरंगाई होणार नाही, अशी व्यवस्था तातडीने निर्माण केली जावी. तसेच गरीब रुग्णांना सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची, कार्यप्रणालीची माहिती जनतेला तातडीने करुन देण्यात यावी, यासंदर्भात यापुढे तक्रार आल्यास हा सभागृहाचा अवमान समजला जाईल आणि संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar)म्हणाले.

Rahul Narwekar
Solapur Bjp News : उदय पाटलांनी भाजपत प्रवेश केला अन्‌ सुभाष देशमुखांनी त्यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

गरीब रुग्णांकडून शिधापत्रिका आणि तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला ही दोन कागदपत्रे पुरेशी असताना रुग्णाची कागदपत्रांसाठी अडवणूक केली जाते. अशा घडना होऊ नयेत, तसेच वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. “गरीब रुग्णांना जलद आरोग्य सेवा पुरविण्यासंदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच उपलब्ध खाटांची माहिती देणारे ॲप तयार केले जावे, यासंदर्भात कोणताही विलंब होऊ नये तसेच रुग्णांची कागदपत्रांसाठी अडवणूक होऊ नये, संबंधितांनी रुग्णसेवा कार्य अधिक तत्परतेने आणि संवेदनशीलपणे व्हावी, असे यावेळी तानाजी सावंत म्हणाले,

या बैठकीत विधानसभा सदस्य राहूल कुल, राम सातपुते, अमिन पटेल, दादाराव केचे, माधुरी मिसाळ, वर्षा गायकवाड, प्रा. देवयानी फरांदे यांनी गरीब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यासंदर्भात रुग्णांलयांकडून असुविधा होत असल्याबद्दल मुद्दे उपस्थित केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com