राज ठाकरेंनी स्वीकारले कांचन गिरींचे आमंत्रण, डिसेंबरमध्ये करणार अयोध्या दौरा

अयोध्या दौऱ्याची घोषणा करून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'हिंदु राष्ट्रा'चा (Hinduttv) अजेंडाही हातात घेतला असल्याचे दिसत आहे.
Raj Thackeray, Sadhvi kanchan giri, Jagatguru Suryachary
Raj Thackeray, Sadhvi kanchan giri, Jagatguru Suryachary
Published on
Updated on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोमवारी (18 ऑक्टोबर) साध्वी कांचन गिरी (Sadhvi kanchan giri) आणि जगद्गुरू सूर्यचार्य ( ) यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंज येथे ही भेट झाली. त्यानंतर या तिघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीदरम्यान कांचन गिरी यांनी राज ठाकरे यांना अयोध्या भेटीचे आमंत्रण देण्यात आले. राज ठाकरेंनीही हे आमंत्रण स्वीकारले.

आता दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे गेली दोन वर्षे हिंदुत्वाशी संबंधित मुद्दे मांडत आहेत. आता अयोध्या दौऱ्याची घोषणा करून राज ठाकरे यांनी 'हिंदु राष्ट्रा'चा अजेंडाही हातात घेतला असल्याचे दिसत आहे.

Raj Thackeray, Sadhvi kanchan giri, Jagatguru Suryachary
आमदार सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांचे काय ?

दसऱ्याच्या निमित्ताने दरवर्षी आयोजित दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व! पण हिंदुत्वाला परक्यांपासून नाही तर ह्या नवहिंदुंपासुन धोका आहे.' असे म्हणत शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याची भूमिका स्पष्ट केली होती. तर दूसरीकडे आता राज ठाकरे यांची हिंदूषी- मुनींशी झालेली भेटही अत्यंत महत्वाची मानली जाते. राज ठाकरे यांचा मनसे पक्ष त्यांच्या घरी साधूंची भेट घेऊन मुंबई बीएमसी आणि इतर राज्य पोटनिवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा झेंडा पूर्णपणे भगवा बदलून हिंदू मतदारांना आकर्षित केले होते.

राज ठाकरे, साध्वी कांचन गिरी आणि जगद्गुरू सूर्यचार्य यांच्यातील या बैठकीचा अजेंडा 'हिंदु राष्ट्रा'चा संकल्प होता. याबाबत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, हिंदु राष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी राज ठाकरे यांच्यासारखी व्यक्ती असणे योग्य आहे असे या संतांना वाटते. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे अयोध्येला जात होते. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तो दौरा रद्द करण्यात आला. आता राज ठाकरे पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्याद्वारे आपला अजेंडा पुढे नेणार आहेत.

अयोध्येच्या वेगवेगळ्या आखाड्यातील अनेक लोक राज ठाकरे यांना फोन करत आहेत. आजोबा आणि पणजोबांच्या काळापासून हिंदुत्व त्यांच्या रक्तात आहे. राज ठाकरे प्रखर हिंदुत्वासाठी प्रभावीपणे काम करू शकतात. राज ठाकरेंनी आक्रमकपणे हिंदुत्वाच्या कार्याचा पाठपुरावा करावा ही देशाची भावना आहे. उत्तर भारतीयांबद्दल त्यांची कोणतीही वाईट इच्छा नव्हती आणि आताही नाही. ती माध्यमांपासून जन्माला आली आहे. तेव्हा त्यांच्या मनात फक्त राज्याच्या विकासाची भावना होती. 23 ऑक्टोबर रोजी भांडुपच्या मेळाव्यात सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील.

.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com