मुंबई : राज्यात सत्तासंघर्षानंतर शिंदे सरकार अस्तिवात आले, पण शिवसेना (shiv sena) कुणी फोडली याबाबत चर्चा अजूनही सुरु आहे. 'भाजप, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांनी शिवसेना फोडली,' असा आरोप केला जात आहे. या आरोपांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (raj thackeray) आज उत्तर दिले. ते एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते. (Raj Thackeray latest news)
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करुन स्वतंत्र गट केला. त्यानंतर संजय राऊतांच्या निशाण्यावर शिंदे गटातील आमदार होते. हे सर्व आमदार गुवाहाटी असताना राऊतांनी एका जाहीर सभेत त्यांना रेडा म्हणून संबोधले होते. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतरही एक-एक आमदार शिंदे गटात सामील होत होते.
'राऊतांच्या विधानामुळे शिवसेना फुटली, त्यांच्यावर अनेक आमदार नाराज होते,' असे बोललं जाते, पण याबाबत राज ठाकरेंना शिवसेनेना कुणामुळे फुटली असे विचारले असता त्यांनी त्यांचे श्रेय त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिले. तर शिवसेना फुटीमागे राऊत जबाबदार नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. "जी गोष्ट घडली त्यांचे श्रेय उद्धव ठाकरेंना द्यावे लागेल," असे सांगत राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
राऊतांमुळे आमदार फुटले नाहीत
राज ठाकरे म्हणाले, "बंडखोर आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले, त्यांच्यावर हल्लाबोल केला. पण शिवसेना फुटली याला संजय राऊत जबाबदार नाही, मी समजू शकतो ते सकाळी टीव्हीवर येतात,त्यांची ती स्टाईल, त्यांचा तो अहंकार, यामुळे माणसं वैतागली, राऊत रोज तेच तेच बोलतात, असे लोकही म्हणू लागले. पण ते तेवढ्यापूरतं होतं, राऊतांमुळे आमदार फुटले नाहीत, त्याचे श्रेय उद्धव ठाकरेंना आहे,"
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. फडणवीस हे राऊतांबाबत बोलत असताना सभागृहातील कार्यकर्त्यांकडून जोरजोरात घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी फडणवीसांनी संजय राऊत यांचे आभार मानण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
"राऊतांनी सतत भाजपवर टीका केली, त्यामुळे राज्यात सत्तात्तर झाले. राज्यात शिंदे सरकार येण्यामागे राऊतांचा मोठा वाटा आहे, सकाळी नऊ वाजता बोलणारे आता कमी बोलू लागले, त्याचे काय कारण आहे मला माहित नाही. तुम्ही त्यांना शिव्या देवू नका प्लीज. त्यांचे आभार माना. हे सरकार येण्यात त्यांचा जेवढा वाटा तेव्हा इतर कुणाचाच नाही," असा टोला फडणवीसांनी यावेळी राऊतांना लगावला.
"राज्यातील जनतेला त्यांनी वैताग आणला. शिवसेनेच्या जनतेला त्यांनी वैताग आणला. सगळ्यांना त्यांनी वैताग आणला. त्यामुळे सगळ्यांनी मिळवून ठरवलं की, हे 'लाऊडस्पीकर' बंद करायचं असेल तर सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही,"अशा शब्दात फडणवीसांनी राऊतांची खिल्ली उठवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.