Raj Thackeray News : '' राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचा..'' ; राज ठाकरेंची बोचरी टीका

Raj Thackeray News: सावरकरांवर बोलण्याची राहुल गांधी यांची लायकी तरी आहे का?
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : मध्यंतरी महाराष्ट्रात म्हैसूर सॅंडल सोप आला होता म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राहुल गांधीची मिमिक्री केली. तसेच ते म्हणाले की, महाराष्ट्रात आल्यावर गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली. पण सावरकरांवर बोलण्याची राहुल गांधी यांची लायकी तरी आहे का असा सवाल करत तो दयेचा अर्ज हा सावरकरांच्या रणनितीचा भाग होता. हे ज्याला कळत नाही तो गुळगुळीत मेंदूचा अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधींवर केली.

Raj Thackeray
'एकनाथ शिंदेंनी रात्री फिरवलेल्या कांडीनंतर उद्धव ठाकरे सगळीकडे फिरतायेत'

राज ठाकरे (Raj Thackeray) हे मुंबईतील गटाध्यक्ष मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्दयांवर भाष्य केले. ठाकरे यांनी यावेळी गांधींची मिमिक्री केली. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, राहुल गांधी ज्या बोलतात त्यावेळी ते तो बोलतात की आरडी बर्मन बोलताहेत हेच कळत नाही.

Raj Thackeray
ठाकरे गटातील नेत्याने थेट मुख्यमंत्री शिंदेंसोबत असलेल्या नाराज नेत्यांची यादीच वाचली

चांगल्यासाठी खोटं बोलणं ही कृष्णनीती आहे. शिवरायांनी मिर्झा राजे जयसिंग यांना किल्ले दिले ती काय चितळेंची बर्फी होती का? पण परिस्थितीनुसार शिवरायांनी त्यावेळी औरंगजेबाविरोधात ही रणनीती वापरली. मात्र, ही नीती ज्याला समजत नाही तो गुळगुळीत मेंदूचा असतो अशा शब्दांत ठाकरेंनी राहुल गांधीवर टीकेची झोड उठवली.

तसेच भाजप व काँग्रेसच्या नेत्यांना माझं हेच सांगणं आहे की, त्यांनी महापुरुषांची बदनामी थांबवावी. तसेच उद्योगधंदे, देशातील सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही ठाकरे यांनी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com