
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज (ता. १ सप्टेंब) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’ निवास्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर या भेटीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्यातील आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसेच मिशन मुंबई'साठी हालचाली सुरु झाल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, मनसे आणि शिंदे गटाकडून शिवसेनेला दूर सारण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळे ही शिंदे-ठाकरे भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
भाजप, मनसे आणि शिंदे गट यांचा राजकीय प्रतिस्पर्धी समान असून भाजपची मुंबई महापालिका जिंकण्याची इच्छा आता लपून राहिलेले नाही. मुंबईत आपलाच महापौर बसविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी पदाधिकारी निवडीपासून पहिल्याच टप्प्यात मुंबईला एक कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेले आहे.
याशिवाय आशिष शेलार यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याकडे मुंबई भाजपची धुरा सोपविण्यात आलेली आहे. त्यांच्या काळात मागील निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८० पेक्षा अधिक नगरसेवक निवडणून आणले होते. त्यामुळे शेलार यांच्याकडेच मुंबई अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आलेली आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीव भाजप, शिंदे गट आणि मनसेची युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.