Raj Thackeray : महिन्याभरात रिझल्ट न दिल्यास घरी पाठवणार; गटबाजी करणाऱ्यांना 'राजादेश'...

Raj Thackeray News : महिन्याभरात कार्यकारिणी बरखास्त करण्याची तंबी..
Raj Thackeray :
Raj Thackeray :Sarkarnama

Mumbai News : अंबरनाथ येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांत दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गट एकमेकांकडे पाठ फिरवूनच काम करीत असल्याची तक्रार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानावर आली होती. ठाणे जिल्ह्याच्या दौरावर असताना अंबरनाथच्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी डोंबिवली येथे बोलावून घेतले. त्यांची चांगली खरडपट्टी त्यांनी काढली. (Marathi News)

Raj Thackeray :
Ambadas Danve Letter to jyotiraditya scindia : बंद विमानसेवा पुन्हा सुरू करा, दानवेंचे पत्र..

खरडपट्टी काढल्यानंतर महिन्याभराची मुदत देत त्यांना आपआपसातील गटबाजी संपविण्याचे आदेश दिले आहे. महिन्याभरात रिझल्ट न दिल्यास सर्व पदाधिकाऱ्यांना घरी बसविण्यात येईल, अशी कान उघडणी देखील त्यांनी केली.

राज ठाकरे यांच्या या आक्रमक पावित्र्यानंतर एकत्रित काम करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर राज यांनी स्वतः पदाधिकाऱ्यांचा एकत्रित फोटो स्वतःच्या मोबाईल मध्ये काढला आहे. यामुळे आता पदाधिकाऱ्यांना मनोमिलन करुन घ्यावे लागणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.

Raj Thackeray :
Devendra Fadnavis Watched The Kerala Story: ‘द केरला स्टोरी’ बघितला, सडक्या मेंदूत येणाऱ्या विचारांना फाशी देण्याची गरज !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे जिल्हाच्या दौऱ्यावर असून सर्व ठिकाणी मनसे पदाधिकाऱी यांची भेट घेत आहेत. दरम्यान त्यांनी उल्हासनगर आणि बदलापूरची कार्यकारणी थेट बरखास्त केली. तत्पूर्वी अंबरनाथची कार्यकारणी देखील गटबाजीमुळे बरखास्त होईल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र आमदार राजू पाटील यांच्या मध्यस्थीमुळे गटबाजी असताना देखील कार्यकारणी बरखास्त झाली नाही.

गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना थेट राज ठाकरे यांनी बैठकीसाठी डोंबिवलीत बोलावले आणि गटबाजी असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी खडेबोल सुनावत गटबाजीत करणारा असाल तर महिन्याभरात कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मात्र यावेळी पदाधिकाऱ्यांनी आम्ही गटबाजी करणार नाही, याची शाश्वती दिली. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपला आक्रमक पवित्रा थोडा नमता घेत, आपल्या मोबाईल मध्ये गटबाजीत सामील असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित फोटो घेतला. यावेळी कट्टर विरोधक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून त्यांनी एकत्रित उभे करत, राज यांनी त्यांचा फोटो स्वतः काढला.

राज ठाकरे यांनी शहापूर मधील 'त्या' माऊली सोबत सुद्धा काढला फोटो :

दोन वर्षापूर्वी शहापूर तालुक्यातील खर्डी गावातील मनसेची शाखा वाचावी म्हणून एक माऊली उपोषणाला बसली होती. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्या माऊलीची भेट घेत त्यांची आस्थेने चौकशी केली. त्यानंतर त्यांच्यासोबत एक फोटो देखील काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com