राज ठाकरे अॅक्टीव्ह मोडमध्ये, भांडूपमध्ये घेणार मेळावा

महापालिका निवडणुकांसाठी मनसेत संघटनात्मक पातळीवर मोठ्या हालचाली सुरू
Raj Thackeray
Raj Thackeray
Published on
Updated on

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं दिसत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुणे, नाशिकनंतर आता आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे. येत्या शनिवारी (२३ ऑक्टोबर) भांडुप (Bhandup) मेळाव्यापासून याची सुरुवात होणार असून हळूहळू राज ठाकरे मुंबई विभागवार पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. महापालिका निवडणुकांसाठी पक्षबांधणी, राजकीय रणनीती याबाबत ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी याबाबत माहिती दिली आहे. भांडुपमध्ये २३ ऑक्टोबरला मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील. महापालिका निवडणुकांसाठी मनसेत संघटनात्मक पातळीवर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Raj Thackeray
''भ्रष्टाचार न करता पिंपरी-चिंचवडमध्ये केलेली दहा जनहिताची कामे दाखवाच''

त्यासाठी राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह मनसे नेत्यांचे पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांचे दौरे वाढले आहेत. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे- नाशिक औरंगाबाद येथील महापालिकांवर मनसेने आपला आपला मोर्चा वळवला आहे. सहा महिन्यांपुर्वीच मुंबई महापालिकेसाठी काम सुरु झाले आहे. नेत्यांकडे विभागवार जबाबदाऱ्या देण्याात आल्या आहेत.

दरम्यान, २०१७च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी मनसे मुंबईत एकूण ४० वॉर्डात दुसऱ्या क्रमांकावर होती. मात्र ७ नगरसेवकांपैकी ६ नगरसेवकांनी अचानक शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेचा फक्त एक नगरसेवक आहे. आगामी निडणूकांसाठी अमित ठाकरे यांच्यासह सर्व नेत्यांना विभागवार जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com