Maharashtra Political News: मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेतली होती. त्या भेटीतून आणि राज्यातील भाजप नेत्यांनी केलेल्या दाव्यांमुळे राज ठाकरे लवकरच महायुतीत सहभागी असल्याचे बोलले जात होते. त्यातच राज यांना भाजपश्रेष्ठींनी शिंदे गटात मनसे विलीन करून अध्यक्षपदाची ऑफर केल्याची चर्चा होती. यावर ठाकरेंनी या अफवा असल्याचे स्पष्ट करून मी मनसेचाच अध्यक्ष राहणार असल्याचे सांगितले.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसेचा मेळवा मुंबईतील शिवतीर्थवर पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी राज्यात ज्या काही मनसेवरून चर्चा झाल्या त्या खोडून काढल्या. ते म्हणाले, वृत्तपत्रातून शिवसेनेत मनसे विलीन करण्याच्या ज्या काही बातम्या आल्या त्या खोट्या असल्याचे सांगितले. ते म्हणाले, शिवसेनेचा प्रमुख व्हायचे असते तर मी सुरुवातीलाच झालो असतो. त्यावेळी माझ्याकडे जवळपास ३२ आमदार, सहा-सात खासदार होते. त्यांनी आपण एकत्र बाहेर पडू असे सांगितले होते. त्यावेळी मला पक्ष फोडून कुठलीही गोष्ट करायची नाही. उद्या काय करायचे झाले तर स्वतःचा पक्ष काढेन. ती माझ्या मनाशीच खुणगाठ बांधली होती.
बाळासाहेब सोडून मी कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. पक्ष फोडून नाही तर स्वतःच्या पक्ष काढून राजकारण करणार असल्याचे ठरवले होते. त्यानंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला. त्यावेळी मी काँग्रेसमध्ये जाणार अशाही चर्चा झाल्या. तरीही त्यातल्या त्यात एकाला संधी दिली होती. पण त्यांना काही समजतंच नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. मी जे आपत्य जन्माला घातले आहे त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार, असा खुलासाच ठाकरेंनी केला.
मेळाव्याच्या सुरुवातीलाच ठाकरेंनी निवडणूक आयोगावर घणाघात केला. ते म्हणाले, लोकसभेच्या निडवणुका लागल्या की सगळे आचरसंहितेवाले जागे झाले आहेत. निवडणुका लागल्या म्हणून महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेसला कामाला लावले आहे. ते काय रुग्णांचे नाडी तापासणार आहेत का? आयोगाला माहिती नसते का मनुष्यबळ लागणार आहे म्हणून? ऐन निवडणुकीच्या काळात अत्यावश्यक सेवेतील लोकांना कामाला लावणे योग्य नाही. त्यांनी आपापल्या रुग्णालयात रुजू झालोत तेच काम करावे. तुम्हाला कोण कामावरून काढते तेच पाहतो, असे म्हणत ठाकरेंनी आयोगाला इशाराच दिला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.