Raj Thackeray Latest Speech : काँग्रेसवाल्यांशी नुसत्या भेटी, पण भाजपवाल्यांशी गाठी पडल्या; राज ठाकरेंच्या स्मृती जाग्या!

MNS Gudi Padwa Melava News : गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी यांच्यासोबत जे माझे संबंध होते. राजकारणाच्या पलीकडेही होते.
Raj Thackeray Latest Speech
Raj Thackeray Latest SpeechSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरील प्रेमासाठी भाजपप्रणित महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरेंनी मध्यंतरी केलेल्या दिल्लीवारी आणि अमित शाह यांच्या भेटीबाबतही भाष् केले आहे. तसेच आपल्याला काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा नेहमी भाजपच जवळची वाटत आली, याचाही खुलासा केला.

राज ठाकरे म्हणाले, "1988-89 च्या दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली. शिवसेनेत असताना सर्वाधिक संबंध माझे कोणाशी आले असतील तर ते भाजपसोबत आले. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी यांच्यासोबत जे माझे संबंध होते. राजकारणाच्या पलीकडेही होते. माझा संबंध काँग्रेस-राष्ट्रवादीशी तसा कधी आला नाही. काँग्रेसवाल्यांसोबत भेटी होत्या. पण गाठीपडल्या भाजपवाल्यांसोबत. तेव्हापासून भाजपसोबत चांगले संबंध स्थापन झाले. नंतर प्रमोद महाजन यांचं निधन झालं. कालांतराने मी गुजरातला गेलो. त्यांच्याशीही माझे चांगले संबंध स्थापन झाले, अशी कबुली राज ठाकरेंनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"निवडणूक आयोगाला माहित आहे की निवडणूक होणार आहे. मग त्यासाठी कर्मचारी, अधिकारी का नाही नेमत विनाकारण प्रत्येक निवडणुकीत शिक्षक, डॉक्टर नर्सेस यांना कामाला का जुंपता. डॉक्टर काय येणाऱ्या मतदाराला तपासणार आहेत का, नर्सेस त्यांचे डायपर बदलणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या कामावर जा, तुम्हाला कामावरून कोण काढते ते बघतोच," असे राज ठाकरे म्हणाले.

"राज ठाकरे हे आता शिवसेनेचे प्रमुख होणार अशी चर्चा केली जाते. अरे मला शिवसेनेचा प्रमुख व्हायचे असते तर तेव्हाच नसतो झालो का? तेव्हाच माझ्या घरी ३२ आमदार, सहा ते सात खासदार माझ्याबरोबर होते. मला कोणाचाही पक्ष फोडून काहीही करायचे नाही. जे काही करायचे असेल तर मी स्वत:चा पक्ष काढून करेल. हीच माझी भूमिका होती. त्यानंतरच मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) हे अपत्य जन्माला घातले. त्यामुळे मी जो पक्ष काढला त्याचाच अखेरपर्यंत प्रमुख राहणार," अशी स्पष्टोक्तीही राज ठाकरेंनी दिली.

"जागा वाटपाची चर्चा झाली. 1995 साली जागा वाटपाला बसलो होतो. दोन तू घे.. चार मी घेतो, असे मला जमत नाही. भाजप मनसेसाठी जागा सोडणार अशी विनाकारण चर्चा केली जात होती. याला कंटाळून मी अमित शहांना (Amit Shah) फोन केला. भेटू म्हणून. त्यांना भेटलो. मग निशाणीवर प्रकरण आले. माझे चिन्ह हे रेल्वे इंजिन आहे. ते सोडून दुसऱ्या चिन्हावर निवडणूक का लढायची, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com