Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातच होणार पहिली 'राजगर्जना'; निशाण्यावर शिंदे की..?

MNS Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रातील पहिली सभा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात होणार आहे.
raj thackeray eknath shinde
raj thackeray eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivali News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे. काही करुन यंदा विधानसभा निवडणुकीत मनसे फॅक्टर यशस्वी करुन दाखवत महाराष्टाच्या सत्तेच्या राजकारणात किंगमेकर व्हायच्या इरादा त्यांनी पक्का केला आहे.

त्यासाठी सुपुत्र अमित ठाकरेंनाही निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) विधानसभा निवडणुकीचे राजकीय फटाके फोडण्यास सज्ज आहे. दिवाळीचे फटाके संपताच त्यांच्या प्रचाराच्या तोफ धडाडणार आहे. या सभेत राज ठाकरेंच्या निशाण्यावर शिंदे असणार की भाजप याविषयी चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाणे जिल्ह्यात तसेच त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्लातून राज हे विधानसभा रणधुमाळीचे रणशिंग फुंकणार आहेत. आपले एकमेव आमदार राजू पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार असून शिंदे गटाचा समाचार आता राज ठाकरे कसा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रातील पहिली सभा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात होणार आहे. सोमवारी 4 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता डोंबिवली येथील श्री महावैष्णव मारुती मंदिर, पी & टी कॉलनी चौकात ही सभा होणार आहे.

raj thackeray eknath shinde
Bjp News : गोपीचंद पडळकरांच्या विरोधातील बंडखोरांचे आव्हान कायम; जतमध्ये फडणवीस घेणार प्रचार सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पाच तारखेपासून प्रचाराचा शुभारंभ करण्याचा विचार करत होते. मात्र ठाणे जिल्ह्यातील मनसेचे शिलेदार असलेले उमेदवार अविनाश जाधव आणि राजू पाटील यांच्या प्रचारासाठी सोमवारचा मुहूर्त साधत राज यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार सोमवारी सायंकाळी चार वाजता डोंबिवली त्यांची सभा होणार आहे.

यावेळी ते विरोधकांचा खरपूस समाचार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिंदे गटाने मनसेला सहकार्य न करता येथे उमेदवार दिला आहे. याचा राग मनसैनिकांमध्ये असून या सभेतून राज हे आपल्या मनसैनिकांचे मनोधैर्य वाढवत त्यांना आणखी ताकदीने लढण्यास सांगणार आहेत असे बोलले जात आहे.

raj thackeray eknath shinde
Rahul Gandhi on Constitution : राहुल गांधी रेशीमबागेतून संविधानाचा बिगुल फुंकणार !

ठाणे जिल्ह्यातून राज ठाकरे प्रचाराचा शुभारंभ करत आहेत याविषयी आमदार पाटील म्हणाले, राजसाहेबांचे आमच्यावर विशेष प्रेम आहे. त्यांनी नेहमीच आम्हाला मुलासारखा मान आणि प्रेम दिलेलं आहे. त्या प्रेमापोटी ते इथून प्रचाराचा शुभारंभ करत आहेत. आणि मला असं वाटतं. ज्या काही गोष्टी सुरू आहेत, त्या त्यांना खटकत देखील असतील. त्या अनुषंगाने काही संदेश द्यायचा असेल, त्यासाठीच ही सभा असेल या सभेतून राजकीय प्रचाराची एक लाईन नक्कीच मिळेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील सभा ठाणे जिल्ह्यामध्ये होणार आहे, ती सभा रद्द झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याविषयी आमदार पाटील म्हणाले, आम्हाला सोमवारी चारची वेळ मिळाली आहे. त्यानंतर त्यांचं काही असेल तर आम्हाला माहिती नाही. प्रत्येकाला अधिकार आहे ते इथून सभा घेऊ शकतात. परंतु मुख्यमंत्री शिंदे कल्याण ग्रामीण मधून प्रचाराची सुरुवात करतील असे मला वाटत नाही.

कारण त्यांच्याकडे अजून महत्त्वाचे बरेचसे मतदार संघ आहेत आणि इथे त्यांचा एकच उमेदवार आहे बाकी सगळे भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत असे बोलत राजू पाटील यांनी शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com