Raj Thackeray News : इशारा राज ठाकरेंचा, हातोडा प्रशासनाचा, अभिनंदन फडणवीसांचं..

Atul Bhatkhalkar Tweet : अनधिकृत मजारीवर हातोडा, फडणवीसांचं केलं अभिनंदन..
Raj Thackeray News :
Raj Thackeray News :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात माहीममध्ये समुद्रामध्ये अनधिकृत दर्गा बांधले जात असल्याचा बांधले जात असल्याचे बोलून दाखवले होते. माहीममध्ये समुद्रात दर्गा उभारला जात असल्याता व्हिडीओ दाखवला होता. हा मुद्दा त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिली.

राज ठाकरेंनी हा मुद्दा उचलल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांकडून संबधित बांधकामाची तातडीने चौकशी करण्यात येत आहे. यासाठी सहा जणांचे पथकही बनवण्यात आले आहे. माहीमच्या खाडीत हे पथक पोहचलं आहे. पाहणी केल्यानंतर आज हे अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू होणार आहे.

Raj Thackeray News :
Suresh Prabhu News : बड्या बँकांना मोठे करण्यापेक्षा, सहकारी बँकांना ताकद देण्याची गरज : सुरेश प्रभुंचे बिनधास्त बोल!

हे अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू झाल्यानंतर आता भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. भातखळकर यांनी ट्विट करत फडणवीसांचे आभार मानले. भातखळकर ट्वीटमध्ये म्हणतात, "माहीममधील मजारीच्या अनधिकृत बांधकामावर जलद कारवाई करत हातोडा मारणाऱ्या गृहमंत्री देवेंद्रजी व खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी शिंदे फडणवीस सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन.."

Raj Thackeray News :
K. Chandrashekar Rao: तेलगंणाच्या मुख्यमंत्र्यांची नांदेड जिल्ह्यात दुसरी सभा, धोंडगेसह अनेकांचा होणार प्रवेश..

गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे काय म्हणाले?

"गेल्या दोन-अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेली गोष्ट मला महाराष्ट्र सरकारला सांगायची आणि दाखवायची आहे. मी मध्यंतरी असाच या भागात गेलो होतो. समोर पाहिलं तर मला समुद्रात लोकं दिसली. काय ते समजेना. मी एकाला सांगितलं की बघ रे काय ते. मग त्या माणसाने ड्रोन शूट करुन माझ्याकडे काही क्लिप्स आणल्या."

Raj Thackeray News :
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर शिंदे सरकारला जाग ; माहीम समुद्रातील अनधिकृत दर्गा पाडणार..

"प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यावर काय घडू शकतं, या गोष्टीचे गैरफायदे कशाप्रकारे घेतले जातात, तुमचं लक्ष असलं पाहिजे कोणत्या गोष्टी होतायत, जो घटना मानणारा मुसलमान यांना विचारणार आहे जे मी दाखवणार आहे ते तुम्हाला मान्य आहे का. मी हे दाखवण्याआधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, मुंबई मनपाचे आयुक्त, मुंबई पोलीस खात्याचे कमिश्नर विवेक फणसाळकर माझी सगळ्यांना विनंती आहे की, यावर जर समजा तुमची कारवाई होणार नसेल त्यानंतर महिनाभरानंतर काय होईल ते पाहिल्यावर मी सांगेल," असा इशाराच राज ठाकरेंनी दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com