मुंबई : हर हर महादेव या चित्रपटावरून सुरू झालेल्या वादाने मंगळवारी (ता. ८ नोव्हेंबर) पक्षीय वळण लागले. संभाजीराजे छत्रपती यांनी विरोधाची भूमिका घेतल्यानंतर सोमवारी (ता. ७ नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ठाण्यात या चित्रपटाचा शो बंद पाडला. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रवक्त्यांना ‘हर हर महादेव’ चित्रपटावर न बोलण्याचा सल्ला दिला आहे. (Raj Thackeray orders MNS spokesperson not to talk about Har Har Mahadev movie)
हर हर महादेव चित्रपटावरून राज्यात जो वाद सुरू आहे. त्यावर बोलू नका, असा आदेश राज ठाकरे यांनी मनसेच्या प्रवक्त्यांना दिला आहे. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणे गरजेचे आहे. मात्र, या प्रकरणाला जातीय वळण दिलं जातं आहे. राष्ट्रवादीची भूमिका ही जातीयवादाकडे नेणारी आहे, त्यामुळे आपण या प्रकरणावर कोणीही बोलू नका, असा आदेश मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी दिला आहे.
दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी ठाण्यात या चित्रपटाचा शो बंद पाडला होता, त्यानंतर मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी चित्रपटाचा शो पुन्हा सुरु केला, त्यामुळे या चित्रपटावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे पुन्हा एकदा समोरामोर उभे ठाकले आहेत. मनसे-राष्ट्रवादीत या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. मनसे संदीप देशपांडे यांनी ट्विट करत आव्हाडांवर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादीच्या डोक्यातून ‘जात’ अजिबात जात नाही.
दुसरीकडे, अमेय खोपकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. ‘शो बंद पडताय, मग आमचे पैसे परत द्या’ अशी मागणी करणाऱ्या मराठी रसिकांना राष्ट्रवादीच्या गुंडांनी मारहाण केली, असा आरोप खोपकर यांनी ट्विटद्वारे केला आहे. तसेच, अफझलखाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब यांचे इतिहासाचे ज्ञान... आणि हे महाराजांचा इतिहास खरा काय आणि खोटा काय ते सांगत आहेत, असा टोलाही खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.