मनसेची राज्यभरातील महाआरती रद्द; राज ठाकरेेंनी दिले आदेश

औरंगाबादमध्ये रविवारी केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी चार तारखेला देशभरात मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केलं आहे.
Raj Thackeray News, MNS News, Raj Thackeray Latest Marathi News, MNS's Maha Arti Cancel News
Raj Thackeray News, MNS News, Raj Thackeray Latest Marathi News, MNS's Maha Arti Cancel News Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी तीन तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्याआधी राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये मनसेकडून महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. पण या आरत्या आता होणार नाही. राज ठाकरे यांनीच कार्यकर्त्यांना तसे आदेश दिले आहेत. भोंग्यांबाबत पुढे काय करायचं हे मंगळवारी (ता. 3) सांगणार असल्याचेही त्यांनी जाहीर केलं आहे. (Raj Thackeray Latest Marathi News)

मनसेच्या वतीने तीन मे रोजी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. पण राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे भाषणात रमजान ईद दिवशी कोणताही वाद निर्माण करायचा नाही, असं स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे महाआरतीचा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही महाआरती चार मे रोजी घेतली जाण्याची शक्यता आहे. याबाबत राज ठाकरे यांच्याकडूनच मंगळवारी भूमिका जाहीर केली जाऊ शकते.

Raj Thackeray News, MNS News, Raj Thackeray Latest Marathi News, MNS's Maha Arti Cancel News
टिळकांनी समाधीसाठी समिती स्थापन केली, पैसे जमवले पण जीर्णोद्धार केला नाही! आव्हाडांचा दावा

महाआरतीबाबत राज ठाकरे यांनी ट्विट करत कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेत. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही, असं राज यांनी स्पष्ट केलं आहे.

भोंग्यांबाबत पुढे काय करायचं?

भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन, असंही त्यांनी सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी तीन तारखेलाचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा चार तारखेपासून मशिदींसमोर भोंग्यांवरून हनुमान चालीसा लावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता ते उद्या काय भूमिका मांडणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

विहिंपची माघार

विश्व हिंदू परिषदेने मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसेच्या हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद सहभागी होणार नाही, असं राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी म्हटलं आहे. विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल मनसेच्या हनुमान चालीसा कार्यक्रमाला पाठिंबा देणार नाही. राज ठाकरे दुष्प्रचाराचं राजकारण करत आहेत. पण विश्व हिंदू परिषद ही कोणतीही राजकीय संघटना नसून कुठल्याही पक्षाशी संघटनेचा संबंध नाही. त्यामुळे राज ठाकरेंच्या हनुमान चालीसा कार्यक्रमाच्या भूमिकेशी विंहिंप सहमत नाही. त्यामुळे विहिंप मनसेच्या हनुमान चालीसाच्या कार्यक्रमात सहभागी न होणार नाही.

गुडीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी पसरली. ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामे दिले. औरंगाबादच्या सभेतही राज ठाकरेंनी पुन्हा इशारा देत सरकारला भोंगे हटवण्यास सांगितले. राज ठाकरेंच्या या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेचं सर्व हिंदु संघटना पाठिंबा देतील, असं मानलं जात होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com