Raj Thackeray News : "निवडणुकीमुळे दोन-तीन महिने आमचीच पक पक ऐकायला लागणार''

Raj Thackeray on Election : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला...
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray Thane News :

निवडणुका आता तोंडावरती आलेल्या आहेत. असे कार्यक्रम तुम्हाला पुढील दोन-तीन महिने बघायला मिळणार नाही. त्यातच आता आमचीच पक पक दोन-तीन महिन्यांत ऐकायला लागणार असल्याचे प्रतिपादन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात बोलताना केले.

दरम्यान, Raj Thackeray यांनी आपण देखील आपल्या भाषेसाठी हट्ट केला पाहिजे. आपण कशाला आपली भाषा सोडायची. असे बोलून येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी सविस्तर बोलणार आहोत. यावेळी महाराष्ट्राचे महत्त्व काय आहे. महाराष्ट्राची ताकद काय आहे. हे सांगणार असून आपल्या महाराष्ट्राला इतिहास आणि भूगोल आहे. असे कुठल्या राज्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

Raj Thackeray
Sristhanak News : ठाणे-मुलुंड मधील नव्या रेल्वे स्थानकास ‘श्रीस्थानक’ नाव द्या - भाजपाची मागणी!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीचा जागर मायबोलीचा, मनसेचा गौरव मराठी मातीचा या कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यातील गावदेवी मैदानात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणू राज ठाकरे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना, त्यांनी वरील प्रतिपादन केले.

अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतात, त्या चित्रपटांमध्ये आवाज तामिळमध्ये असतात. कन्नडमध्ये असतात. खूप ठराविक चित्रपट आहेत. तुम्ही सर्च केलं की लक्षात येईल. खूप मराठी चित्रपट इंग्रजी येत असलो तरी मराठी चित्रपट लोक बघतात. दक्षिणेतल्या लोकांना भाषा समजत नाही. त्यांचा हट्ट असतो की त्यांचा चित्रपट त्याचाच भाषेमध्ये बघण्याचा असतो. आपण देखील हट्ट केला पाहिजे आपण कशाला आपली भाषा सोडायची, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनसे मराठी भाषेसाठी एक ( Thane Politics ) शपथ घेऊन येणार आहे. मराठी माणसाने मराठी भाषेसाठी काय केले पाहिजे, यात असणार आहे. मराठी भाषा दिवस 365 दिवस साजरा करूया, मातृभाषा टिकवूया यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रातील मराठी मान्यवरांचा सत्कार राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

Raj Thackeray
Kalyan-Dombivli Budget : कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांना राष्ट्रगीताचा विसर; बजेटमध्ये मागील घोषणांची पूर्तता नाही...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com