राज ठाकरे घेणार राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा समाचार?

राहुल गांधी यांच्यावरही राज ठाकरे काय बोलणार, याचेही औत्सुक सर्वांना आहे.
Raj Thackeray-Bhagat Singh Koshyari
Raj Thackeray-Bhagat Singh KoshyariSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज (ता. २७ नोव्हेंबर) मुंबईतील गोरेगावमध्ये सभा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वारंवार अवमानकारक वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजप प्रवक्त्याचा समाचार या सभेत राज ठाकरे हे घेणार का?, याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. (Raj Thackeray will speak on Governor Bhagat Singh Koshyari, Rahul Gandhi)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गट अध्यक्षांचा मेळावा होणार आहे. हा मेळावा मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को मैदानावर सायंकाळी सहाच्या सुमारास होणार आहे. या सभेत राज ठाकरे हे पक्षाच्या गट अध्यक्षांना कोणता संदेश देणार आहेत. पक्षवाढीसाठी कशा पद्धतीने मार्गदर्शन करणार याकडे मनसे कार्यकर्त्यांचे कान असणार आहेत.

Raj Thackeray-Bhagat Singh Koshyari
हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात दिल्ली कोर्टाचे अटक वॉरंट; पण दिल्ली पोलिस...

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर भाजप आणि शिंदे गट वगळता सर्वच पक्षाकडून राज्यपालांवर चोहोबाजूने टीका करण्यात येत आहे. भाजप आणि शिंदे गट वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. तसेच, भाजप प्रवक्त्याच्या विधानावरही सर्वच बाजूने टीकास्त्र सोडण्यात येत आहे.

Raj Thackeray-Bhagat Singh Koshyari
काडादी-शहा वादात वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी : काडादींसमोर ठेवला हा प्रस्ताव; शहा म्हणतात पोलिसांनी...

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची सभा होणार आहे, त्यामुळे ती काय भूमिका घेतात, याची उत्सुकता सर्वांना आहे. याशिवाय राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावरही माफीनाम्याचा आरोप केला होता. त्यानंतर मनसेने गांधी यांच्या विरोधात बुलडाण्यात जाऊन निषेध केला हेाता. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावरही राज ठाकरे काय बोलणार, याचेही औत्सुक सर्वांना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com