शरद पवार, राष्ट्रवादीला महाराष्ट्रात जातीयवाद हवाय : राज ठाकरेंचा घाणाघाती आरोप

राष्ट्रवादीचा जन्म १९९९ मध्ये झाला, तेव्हापासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना महाराष्ट्रात जातीयवाद हवा आहे. राष्ट्रवादीचा जन्म १९९९ मध्ये झाला, तेव्हापासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे. राष्ट्रवादीने दुसऱ्या जातीचा द्वेष निर्माण करायला लावला. त्यामधून समाजात फूट पाडली जात आहे, असा घाणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात शनिवारी (ता. २ एप्रिल) केला. (Raj Thackeray's criticism on Sharad Pawar And NCP)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे बोलत होते. त्यांनी सचिन वाझेपासून छगन भुजबळ, नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, हिंदू-मुस्लीम दंगलींमध्ये फक्त हिंदू असतो. ता. २६ जानेवारी आणि १६ ऑंगस्टला तो भारतीय होतो. चीनने आक्रमण केल्यावर त्याला कळतच नाही, त्याला आपण कोण आहोत ते. हे जेव्हा कळतं नाही, तेव्हा तो मराठी, गुजराती, तामिळ, बंगाली, बिहारी होतो. तो मराठी जेव्हा होतो, त्यावेळी तो मराठा, ब्राम्हण, माळी, आगारी असतो. हे काही लोकांना हवी आहे. काही लोकांना कशाला राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शरद पवारांनाच ही गोष्ट हवी आहे.

Raj Thackeray
जयंतराव, पवारसाहेब तुम्ही-आम्ही पाहुणे होऊ शकतो : जानकरांचा राष्ट्रवादीपुढे मैत्रीचा हात

राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म १९९९ मध्ये झाला, तेव्हापासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे. पूर्वी जात होती. पण ती अभिमानाची गोष्ट होती. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर त्यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष निर्माण करायला लावला. समाजामध्ये फूट पाडली जाते. इतिहास वाचायचा नाही. इतिहास लिहिला कोणी तर बाबासाहेब पुरंदरे यांनी. तर मग तो चुकीचा आहे; कारण पुरंदरे हे सॉफ्ट टार्गेट आहेत, असेही राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं.

Raj Thackeray
दिल्लीत थोडा धक्का मारा, तुम्ही पंतप्रधान होऊ शकता : जानकरांची पवारांना सूचना

राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतरच जेम्स लेन जन्माला आला आहे. तो कोण होता. तो कुठे होता. त्या भिकारड्या जेम्स लेननी आमच्या जिजाऊसाहेबांबद्दल लिहिले आहे, ते आम्ही उघाळत बसलो आहे. ज्यांचा शिवरायांशी काहीही संबंध नसताना तो जेम्स लेन येथे येऊन काहीही तरी लिहितो आणि आम्ही तेच उघळत बसतो, हे काय चालेले आहे. निवडणुकीत पैसा टाकायचा, आपल्यामध्ये भांडणं लावायचं हे सध्या सुरू आहे. निवडणुकीत तुम्हाला वेडेपिसे करून टाकले जाते, असे आरोपही राज ठाकरेंनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com