Raj Thackeray Reaction : अजितदादांच्या शपथविधीनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; शरद पवारांना उद्धव ठाकरेंचं ओझं उतरवायचं होतं

राज ठाकरे यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील नव्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं
MNS Raj Thackeray
MNS Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली आहे, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दिली आहे. (Raj Thackeray's reaction after Ajit pawar's swearing-in)

अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील नव्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.

ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं, असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं आहे.

राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com