Rajendra Gavit News : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेले राजेंद्र गावित 'या' मतदारसंघातून मैदानात उतरणार !

Political News : पालघर लोकसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारलेले माजी खासदार राजेंद्र गावित पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत.
Rajendra Gavit
Rajendra GavitSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने जोरात सुरु केली आहे. महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या जागावाटपाकडे लागले आहे.

त्यातच इच्छुक असलेल्या मंडळींनी जॊरात तयारी सुरु केली आहे. पालघर लोकसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारलेले माजी खासदार राजेंद्र गावित पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांची ऐनवेळी उमेदवारी कापण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन कशा प्रकारे केले जाणार याची उत्सुकता त्यांच्या कार्यकर्त्यांना लागली असतानाच त्यांनी पालघर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या वाटायला आलेला पालघर विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कॊणाच्या वाट्याला येणार याची उत्सुकता लागली आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात 2018 साली झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या राजेंद्र गावित यांना 2019 मध्ये महायुतीतर्फे शिवसेनेतून निवडणूक लढवणे भाग पडले होते. शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्याशी संलग्न राहिले होते.

२०२४ या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपातर्फे केलेल्या सर्वेक्षणात गावित यांचे नाव नसल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याचे आश्वासन वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले होते.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, नालासोपारा व बोईसर या चार जागांवर भाजपने दावा केला आहे. तर दुसरीकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत हे नियमितपणे भाजपा सर्व सहा विधानसभा जागा लढवणार असे सांगत आले आहे.

माजी खासदार राजेंद्र गावित यांनी सुरुवातीला विक्रमगड मतदारसंघात उमेदवारी मिळण्याबाबत चाचपणी केली होती. त्याठिकाणी भाजपमधील इच्छुक जास्त असल्याचे लक्षात येताच त्यांनी पालघरकडे लक्ष वळविले आहे.

Rajendra Gavit
Mahayuti Seat Allotment : महायुतीच्या जागावाटपाबाबत बावनकुळेंचे मोठे विधान; 176 जागांवर एकमत, मतभेद असणाऱ्या 112 जागा कोणत्या?

भाजपसाठी पालघर विधानसभा मतदारसंघ सुरक्षित मानला जात असल्याने राजेंद्र गावित यांनी या मतदारसंघात देखील संपर्क दौऱ्यांचे आयोजन केले होते. मात्र विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा तसेच शिवसेनेतून इच्छुक असणाऱ्या वैदेही वाढाण व अन्य मंडळींनी आपला इरादा स्पष्टपणे मांडला असून राजेंद्र गावित यांना भाजप उमेदवार म्हणून स्वीकारणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. दुसरीकडे गावित यांनी बोईसर विधानसभा क्षेत्रात देखील चाचपणी करीत असून त्या ठिकाणी माजी आमदार विलास तरे हे भाजपातर्फे तयारी करीत आहेत.

काही जागांवर तडजोड करावी लागणार

येत्या काळात पालघरमधून राजेंद्र गावित यांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित केल्यास शिवसेनेकडे असलेली महायुतीची जागा भाजपकडे देणे अपरिहार्य ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला पालघर जिल्ह्यातील इतर काही जागांवर तडजोड करावी लागेल, अशी शक्यता आहे. एकीकडे शिवसेनेत शिंदे गटात असणारे अनेक इच्छुक उमेदवार शिवसेनेच्या ठाकरे गटाशी संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rajendra Gavit
MVA News : जागावाटपावरून 'मविआ'च्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, 'काही गोष्टी...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com