#COVID2019 पंतप्रधानांच्या 'जनता कर्फ्यू'ला प्रतिसाद द्या : राजेश टोपेंचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू'चे जे काल आवहन केले आहे, त्याला जनतेने १००% प्रतिसाद दिला पाहिजे असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री मंत्री राजेश टोपे यांनी येथे केले
Rajesh Tope appeals to Respond PM's Appeal of Janata Curfew
Rajesh Tope appeals to Respond PM's Appeal of Janata Curfew
Published on
Updated on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू'चे जे काल आवहन केले आहे, त्याला जनतेने १००%  प्रतिसाद दिला पाहिजे, या आजारातून मुक्त होण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले जगभर थैमान घातलेल्या कोरोना रोगाची साथीचा राज्यातील आकडा वाढला असून तो ५२ इतका झाला आहे. मात्र लागण झालेल्या पाच रूग्णांवर उपचार सुरू केल्यानंतर ते पूर्ण बरे झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले, ही दिलासादायक बाब आहे, असेही टोपे म्हणाले. 

ही माहिती सांगताना टोपे म्हणाले की जे रुग्ण दाखल झाले होते त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ५ रुग्णांना आज डिस्चार्ज दिला जाईल. याचा अर्थ रुग्ण बरा होतो आहे. आज कोरोन रुग्ण वाढलेले आहेत. मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड येथील रुग्णात वाढ झाली आहे. आता महाराष्ट्रातील संख्या ५२ झाली आहे, असेही ते म्हणाले. 

महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत अतिदक्षतेचा रुग्ण असेल त्याचा संपूर्ण खर्च सरकार करते. आतापर्यंत जी लक्षण आढळलेली आहेत ते प्रवासी ९७१ होते व एकूण १०३६ प्रवाशांची तपासणी केली होती.आता आपण सहा लॅब मध्ये टेस्ट करत आहोत, येणाऱ्या दिवसात ही संख्या बार होईल,असेही टोपे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com