Raju Shetti News : राजू शेट्टी 'मविआ'ची ऑफर स्वीकारणार..; 'हातकणंगले' साठी इंडिया आघाडीत सहभागी होणार ?

Maharashtra Politics : प्रागतिक विचार मंचला लोकसभेला आणि विधानसभेला काही जागा देण्यात येणार आहेत.
Raju Shetti
Raju Shettisarkarnama

Mumbai : प्रागतिक विकास मंच इंडिया आघाडीत सहभागी झाल्यास हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची पावले आता इंडिया आघाडीकडे वळू लागली आहेत. (Latest Marathi News)

नरेंद्र मोदींना सत्तेपासून रोखण्यासाठी इंडिया आघाडीकडून रणनीती आखली जात आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या छोट्या मोठ्या तेरा पक्षांनी एकत्र येऊन प्रागतिक विकास मंचची तिसरी आघाडी तयार केली.याचे नेतृत्व राजू शेट्टी करीत आहेत. (Raju Shetti News)

Raju Shetti
Ambadas Danve News : भाजपने बहीण-भावामध्ये फूट पाडली ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

एकेकाळी भाजपशी संधान साधलेल्या राजू शेट्टींनी आता भाजपची फारकत घेतली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजपला टक्कर देण्यासारखा उमेदवार इंडिया आघाडीकडे नाही. अशा परिस्थितीत इंडिया आघाडीचा उमेदवार उभा केल्यास प्रागतिक विकास मंच यांच्यामुळे मतांचे विभाजन होईल, असे मत महाविकास आघाडीचे आहे. जर इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा झाल्यास शेट्टींना ताकद दिल्यास आघाडीचे ध्येय साध्य होईल, असा अंदाज आहे.

हातकणंगलेची जागा स्वाभिमानीला देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांच्यात चर्चा सुरू आहे. प्रागतिक विचार मंचला लोकसभेला आणि विधानसभेला काही जागा देण्यात येणार आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्याशीदेखील चर्चा झाल्याने हातकणंगलेची जागा देण्याबाबतचा शब्द त्यांनी दिला आहे. लवकरच पूर्ण प्रागतिक मंच इंडिया आघाडीत सहभागी होणार आहे.

Raju Shetti
Sanjay Pandey News : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना दिलासा ; सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट ; पुरेसे पुरावे नसल्याचे...

आमदार जयंत पाटील यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीबरोबरच चर्चा सुरू आहे. पहिला टप्पा म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. येत्या चार सप्टेंबरला कोल्हापुरात विचार मंचची बैठक होणार आहे. हा मंच महाविकास आघाडी व 'इंडिया'मध्ये सहभागी होण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

प्रागतिक विकासमध्ये सहभागी असलेले पक्ष

स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, माकप, सुराज्य, समाजवादी, बहुजन विकास आघाडी, भाकप यासह विविध तेरा पक्षांनी एकत्र येत राज्यात प्रागतिक विचार मंच या नावाने तिसरी आघाडी स्थापन केली आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com