Rajya Sabha Election LIVE : लक्ष्मण जगताप कार्डियाक ॲम्बुलन्सने मुंबईकडे रवाना

लक्ष्मण जगताप यांना ५० दिवसांच्या उपचारानंतर पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आले आहे.
 Laxman Jagtap
Laxman JagtapSarkarnama
Published on
Updated on

पुणे : चिंचवड विधानसभेच्या भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxamn Jagtap) हे अतिशय आजारी असल्याने ते आज होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांच्या मतदानासाठी मुंबईला जातील का ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण "पक्षाचा आदेश आहे आणि तो मला पाळायचायं," या मतावर ठाम असलेले जगताप हे मुंबईच्या दिशेने ॲम्बुलन्सने मुंबईकडे रवाना झाले आहेत. (Rajya Sabha Election Latest News)

लक्ष्मण जगताप हे एका कार्डियाक ॲम्बुलन्सने मुंबईकडे सकाळी आठ वाजता रवाना झाले आहेत. यावेळी लक्ष्मण जगताप यांच्या सोबत त्यांचे निकटवर्तीय आणि डॉक्टरांचे पथक यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. ते जवळपास बारा वाजता दरम्यान विधानभवनात पोहोचणार आहेत.

लक्ष्मण जगताप यांना ५० दिवसांच्या उपचारानंतर पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आले आहे. यापूर्वी ते अमेरिकेतही उपचार घेऊन आले होते. त्यानंतरही त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना १२ एप्रिल रोजी ज्यूपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना व्हेंटीलेटर देखील लावण्यात आला होता. या दरम्यान, अमेरिकेहून मागविलेल्या सुमारे एक लाख रुपयांच्या इंजेक्शनमुळे त्यांच्या प्रकृती कमालीची सुधारणा झाली आहे.

 Laxman Jagtap
Rajya Sabha Election 2022 : २८५ आमदारांनी मतदान केलं ; आता प्रतिक्षा निकालाची

राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election) रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलीय. मुंबईत आज विधानभवनाच्या चौथ्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात ६ जागांसाठी मतदान होणार आहे. विजयासाठी भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूला अगदी एक-एक मत महत्वाचं बनलयं. सोबत अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांच्या हातात विजयाची चावी आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी मतांची बेरीज केली जातीयं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com