Rajyasabha Election : आघाडी, भाजपचं टेन्शन वाढलं ; हितेंद्र ठाकुरांचा निर्णय गुलदस्त्यात

"आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. आमची मते गृहीत धरू नका"
Rajyasabha Election Latets News
Rajyasabha Election Latets Newssarkarnama

वसई : : राज्यसभा निवडणुकीत (RajyaSabha election) आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा, यासाठी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) या दोन पक्षात चुरस लागली आहे. भाजप आणि शिवसेनेला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी काही मते कमी पडत आहेत. (Rajyasabha Election Latets News)

कमी पडणाऱ्या मतांसाठी या दोन्ही पक्षांची मदार अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांवर अवलंबून आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या बहुजन विकास आघाडीने ( Bahujn Vikas Agahdi) या निवडणुकीत भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पण त्या फक्त चर्चा आहेत, अजून आम्ही निर्णय घेतला नसल्याचे बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर (Hitrendra Thakur) यांनी स्पष्ट केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

पालघर जिल्ह्यात वर्चस्व असणाऱ्या बहुजन विकास आघाडीचे ( Bahujn Vikas Agahdi ) तीन आमदार या निवडणुकीत भाजपच्या बाजूने आपला कौल देणार आहेत, अशा बातम्या कालपासून माध्यमांमध्ये येत आहेत. यावर आमदार हितेंद्र ठाकुर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Rajyasabha Election Latets News
किरीट, जब तक गब्बर ऊपर बैठा है..तब तक नाच ले, जितना नाचना है ; विद्या चव्हाणांचा हल्लाबोल

क्षितिज ठाकूर ( Shitij Thakur),हितेंद्र ठाकूर आणि राजेश पाटील ( Rajesh Patil ) हे बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत.

हितेंद्र ठाकूर म्हणाले, "आम्ही भाजपाला पाठिंबा देतोय असं माध्यमचं ठरवत आहेत. राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार ज्यांनी आम्हाला विकासासाठी मदत केली त्यांच्यासोबत आम्ही असू,"

"निवडणुकीसाठी अजून दहा तारखेपर्यंत वेळ आहे. त्यामुळे आम्ही तोपर्यंत योग्य तो निर्णय घेऊ. त्यामुळे आमची मते गृहीत धरू नये," असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com