Ram Non-Vegetarian controversy : राम मांसाहारी हे पंतप्रधान मोदींना मान्य?

PM Modi Agree with Jitendra Awhad : आमिष त्रिपाठी यांनी मोदींना भेट दिलेल्या पुस्तकातही राम मांसाहार करीत असल्याचा उल्लेख, राष्ट्रवादीकडून 'सोशल' हल्ला...
Jitendra Awhad, Narendra Modi, Amish Tripathi
Jitendra Awhad, Narendra Modi, Amish TripathiSarkarnama
Published on
Updated on

जुई जाधव

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) सोशल मीडियावरून एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला आहे आणि त्यावरून भाजपकडून मौन बाळगण्यात आले आहे. प्रश्न जितेंद्र आव्हाडांबद्दलचा आहे आणि विषय रामाच्या मांसाहाराबद्दलचा आहे. त्यामुळे आव्हाडांच्या वक्तव्याशी पंतप्रधान मोदी सहमत आहेत का, असा सवाल विचारण्यात येत आहे. याला निमित्त ठरले आहे ते लेखक आमिष त्रिपाठी यांच्या पुस्तकाचे!

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील अधिवेशनात जितेंद्र आव्हाड यांनी रामाबद्दल ते मासांहार करीत होते, असे वक्तव्य केले होते. त्यावरून भाजपसह शिंदेंची शिवसेना आणि हिंदुत्ववादी संघटनांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलने करून त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर आव्हाड यांनी वाल्मीकी रामायणातील रामाच्या मांसाहाराचा संदर्भ देऊन खेद व्यक्त केला होता. त्यानंतरही आव्हाडांवर भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांकडून टीका होत आहे.

त्यावर आता राष्ट्रवादीच्या मीडिया सेलने एक शस्त्र बाहेर काढले आहे. लेखक आमिष त्रिपाठी यांनी 'सायन ऑफ इक्ष्वाकु' हे पुस्तक पंतप्रधान मोदींना भेट दिले होते, त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पुस्तकात राम मांसाहार करीत असल्याचे धडधडीतपणे लिहिले आहे. त्याला भाजपने कधी विरोध केला नाही. विशेष म्हणजे मोदींनीही त्यावर मौलिक अभिप्राय दिला आहे. यावरून आता राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाने एक मोठे ट्विट केले आहे. 'आव्हाडसाहेब बहुजन असून त्रिपाठी नाहीत एवढीच एक चूक आहे,' असे ट्विट राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया राज्यप्रमुखामार्फत करण्यात आले आहे.

मोदींना भेट दिलेल्या पुस्तकात काय आहे?

आमिषने त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की 'माझ्या कथेचा राम एक सामान्य व्यक्ती आहे. क्षत्रिय असताना तो मांसाहार करायचा, वाल्मीकींच्या रामायणातही तेच आहे. 'रामचरितमानस'मध्ये त्याला देव म्हणून दाखवले आहे.'

हे पुस्तक आमिष त्रिपाठी यांनी पंतप्रधान मोदींना भेट दिले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "लेखनामुळे भारताच्या समृद्ध भूतकाळाबद्दल आणि संस्कृतीबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे," असं विधान केल्याचे छापून आले आहे.

आव्हाड काय म्हणाले होते?

शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्षे जंगलात असणारा राम शिकार करायचा. रामाने 14 वर्षे वनवास भोगला होता, मग तो शाकाहारी कसा असू शकतो? असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.

(Edited by Avinash Chandane)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com