रामदास आठवलेंचे आर्यन खानला समर्थन

एनसीबीला पाच ग्रॅम ड्रग्जची माहिती मिळू शकते मग सर्रास गांजा, ड्रग्ज ओढणारे बाबा का दिसत नाहीत का?
Ramdas Athwale- Aryan Khan
Ramdas Athwale- Aryan Khan Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : '' कायद्यापुढे सर्व समान आहेत. मग तो शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन असो, की कुंभमेळ्यात गांजा ओढणारे भोंदू बाबा. सगळ्यांनाच समान न्याय द्यायला हवा. नशा करणाऱ्या भोंदू बाबांनाही कायद्यानुसार तुरुंगात डांबावे आणि सामाजिक न्याय विभागाच्या भूमिकेनुसार त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात भरती करावे, असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी नाव न घेता आर्यन खानचे समर्थन केले आहे.

'एनसीबीला पाच ग्रॅम ड्रग्जची माहिती मिळू शकते मग सर्रास गांजा, ड्रग्ज ओढणारे बाबा का दिसत नाहीत का? असा सवाल आठवले यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर, आश्रमात ड्रग्ज खरेदी-विक्री होत असेल तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तिथेही कारवाई करावी, अशी सूचनाही रामदास आठवले यांनी दिल्या आहेत.

तसेच, अमली पदार्थ नियंत्रण पथकाचे अधिकारी समीर वानखेडे हे दलित असल्यामुळे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे त्यांना लक्ष्य करीत आहेत. मलिकांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याच्या रागातून नवाब मलिकांनी वानखेडे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे, असा आरोपही रामदास आठवले यांनी केला आहे.

तसेच, यावेळी त्यांनी चित्रपटसृष्टीला ‘ड्रग्ज फ्री’ बनवण्याची गरज आहे. पण नशा करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू नये, असेही म्हटले आहे. मद्यपान करणाऱ्यांना तुरुंगात पाठवले जात नाही, मात्र अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याची कायद्यात तरतूद आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून, आमच्या मंत्रालयाचे असे मत आहे की, एखाद्या व्यक्तीने अमली पदार्थांचे सेवन करू नये, परंतु जर त्याने केले तर त्याला तुरुंगात पाठवले जाऊ नये, असेही रामदास आठवले यांनी नमुद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com