राणा दांपत्याची माघार; न्यायालयातून अर्ज घेतला मागे

हनुमान चालिसा प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्यानं वाद ओढवून घेतला होता.
Navneet Rana and Ravi Rana Latest Marathi News
Navneet Rana and Ravi Rana Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : हनुमान चालिसा प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्यानं वाद ओढवून घेतला होता. या प्रकरणी ते जामिनावर सुटले आहेत. पण मुंबईतील खार निवासस्थानातील अनधिकृत बांधकामप्रकरणी अजूनही त्यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. महापालिकेने बांधकामाबाबत बजावलेल्या नोटिशीविरोधात त्यांनी दिंडोशी न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घेतला आहे. (MP Navneet Rana and MLA Ravi Rana Latest Marathi News)

मुंबईतील खार येथील राणा दांपत्याच्या निवासस्थानाचे बांधकाम अनाधिकृत असल्याची नोटीस महापालिकेने बजावली आहे. राणा दांपत्यानं १५ दिवसांच्या आत बांधकाम पाडावं नाहीतर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. त्यानंतर त्यांनी या नोटिशीला दिंडोशी न्यायालयात आव्हान दिलं होतं.

Navneet Rana and Ravi Rana Latest Marathi News
नरसंहार : शाळेतील बेछूट गोळीबारात 18 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

राणा दांपत्यांच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी त्यांनी घरातील बेकायदेशी जोडणी आणि फेरपार नियमित करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे नोटिशीला आव्हान देणार अर्ज मागे घेत असल्याचेही त्यांनी न्यायालयात स्पष्ट केलं. त्यानंतर न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करून अर्ज निकाली काढला.

बांधकाम नियमित करण्यासाठी न्यायालयाने राणा दांपत्याला एक महिन्याची मुदतही दिली आहे. त्यानुसार आता त्यांना पालिकेकडे अर्ज करावा लागणार आहे. राणा दांपत्याचा खार येथील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. त्या अपार्टमेंटचे बांधकाम अनाधिकृत असल्याचं महापालिकेनं जाहीर केलं आहे.

Navneet Rana and Ravi Rana Latest Marathi News
संजय पवारांना कोल्हापूरचेच महाडिक देणार टक्कर? राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपची खेळी

त्यानंतर महापालिकेनं राणा दांपत्याला ७ दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटिशीची मुदत संपल्यानंतर महापालिकेने पुन्हा एकदा राणा दांपत्याला नोटीस बजावली आहे. याचबरोबर कारणे दाखवा नोटिशीला राणा दांपत्यानं दिलेली उत्तरे महापालिकेने अमान्य केली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com