Girish Mahajan and Raosahaeb Danve
Girish Mahajan and Raosahaeb DanveSarkarnama

राजकीय नेत्यांना कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले; दानवेंपाठोपाठ महाजनही पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात राजकीय नेत्यांना कोरोना (Covid-19) संसर्गाचे प्रमाण वाढले आहे.
Published on

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधित (Covid-19) रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस चढताच असून, वैद्यकीय ऑक्सिजनच्या मागणीतही दिडपट वाढ झाल्याने चिंतेत भर पडली आहे. यातच राजकीय नेत्यांना कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. भाजपचे (BJP) नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आता पॉझिटिव्ह आले आहेत.

गिरीश महाजन यांची कोरोना चाचणी पॅाझिटीव्ह आली आहे. त्यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भाजप नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Girish Mahajan and Raosahaeb Danve
सोनिया अन् राहुल गांधी आमच्या राज्यात आल्यास? भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

दानवे यांनीच ट्विटरवर याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने माझी कोरोना चाचणी केली. ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी विलगीकरणात आहे. याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ चाचणी करावी व काळजी घ्यावी.

काल (ता.७) राज्यात राज्यात कोरोनाचे ४० हजार ९२५ नवीन रुग्ण सापडले असून, २० कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दुसऱ्या बाजूला राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनच्या मागणीतही कमालीची वाढ झाली आहे. राज्यात सध्या दिवसाला ४२४ मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हीच मागणी दिवसाला २७० ते ३०० मेट्रिक टन होती. त्यामुळे सर्वसाधारण वैद्यकीय ऑक्सिजनच्या मागणीत दिडपट वाढ झाली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्याकडे वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरेसा साठा असून कमतरता भासणार नाही आणि पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेसारखीही परिस्थिती निर्माण होणार नाही, असा दावा अन्न आणि औषध प्रशासनाने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com