Raosaheb Danve : '' उद्या निवडणुका अन् आपण एकटेच आहोत..'' ; दानवेंकडून पुन्हा मध्यावधीचे संकेत?

आम्ही ज्यादिवशी निवडून येतो त्या दिवसापासून पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागतो.
Central Minister Raosaheb Danve
Central Minister Raosaheb DanveSarkarnama

ठाकरे गटाचे खासदार व नेते संजय राऊतांसह महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीकडून सातत्याने राज्यातील शिंदे फडणवीस सरकार लवकरच कोसळणार असल्याचं भाकितं वर्तविण्यात येत असतात. पण याचवेळी भाजपसह शिंदे गटाकडून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा आत्मविश्वास व्यक्त करण्यात येतो. मात्र, भाजप नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानांमुळे पुन्हा शिंदे फडणवीस सरकारच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मध्यावधी निवडणुकांच्या चर्चांना जोरदार उधाण आले आहे. (Raosaheb danve Latest News)

Central Minister Raosaheb Danve
Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंवर शाईफेक ; सोलापुरात संभाजी ब्रिगेडचा पत्रकार परिषदेत राडा

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे नेहमीच त्यांच्या हटके भाषणशैली आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मात्र, गंगाखेड येथील कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दानवे यांनी यावेळी मध्यावधी निवडणुकांचे संकेत देणारं मोठं विधान केलं आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचाल्या आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, खासदार प्रतापराव चिखलीकर उपस्थित होते.

Central Minister Raosaheb Danve
Uday Samant : शिंदे गुवाहाटीवरुन परतल्यावर ठाकरे गटाला आणखी खिंडार पडणार ? ; सामंतांचे सूचक विधान

दानवे म्हणाले, निवडणुका वेळेवर होतील. मात्र, उद्या निवडणुका आहे आणि आपण एकटेच आहोत असं समजून तयारीला लागा. आम्ही ज्यादिवशी निवडून येतो त्या दिवसापासून पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागतो. म्हणून नेहमी नेहमी निवडून येतो.

तसेच भाजप वाढली नाही, कारण की, पंचवीस तीस वर्ष आमच्या बापाला लढायला भेटलं नाही.. ना झेडपी, ना पंचायत समिती, ना आमदारकी ना खासदारकी… तर पक्ष वाढेल कसा? असेही दानवे यांनी सांगितले.

मध्यावधी निवडणुकांचा प्रश्नच नाहीच; सामंतांचं स्पष्टीकरण

मात्र, मध्यावधी निवडणुका लागण्याचा प्रश्नच येत नाही. काही लोकांना भीती वाटते की, आपल्याकडचे लोक इकडे-तिकडे जातील की काय! त्यामुळे त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हे सगळं चाललंय. शिंदे गट गुवाहाटीवरुन परत आल्यानंतर ठाकरे गटाला आणखी खिंडार पडले की नाही हे लवकरच समजेल असे सूचक विधान शिंदे गटाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com