Mumbai News : फोन टॅपिंग प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशा आशयाचं ट्विट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. पण अवघ्या तासाभरातच त्यांनी हे ट्विट डिलीट केल्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या अधिकारी म्हणून रश्मी शुक्ला यांची ओळख आहे. त्यांनी पुण्याचे (Pune) पोलिस आयुक्त, डीआयजी (प्रशासन), नागपूरच्या एसपी आणि सोलापूरचे डीसीपी अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), म्हणून काम पाहिले आहे.
पण राज्य गुप्तचर विभागाच्या (SID) आयुक्तपदाचा त्यांचा कार्यकाळ चांगलाच वादग्रस्त ठरला होता. या सर्व आरोपांतून त्यांना दिलासा मिळाल्यानंतर आता त्यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात रश्मी शुक्लांवर गुन्हे दाखल झाले होते. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन केली होती. तत्कालीन राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता, पण गेल्याच महिन्यात या 'फोन टॅपिंग'मध्ये शुक्लांना मोठा दिलासा न्यायालयाने दिला आहे. (Rashmi Shukla Latest News)
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.