Ravindra Chavan : रवींद्र चव्हाणांच्या गळ्यात पडणार भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ?

Chandrasekhar Bawankule : सध्या बावनकुळे हे खासदारकीसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे.
 Ravindra Chavan News
Ravindra Chavan NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP state President : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महाविकास आघाडीला चेकमेट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. यामुळेच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार असल्याची चर्चा आहे. असे असले तरी भाजपच्या एक व्यक्ती एक पद या प्रथेप्रमाणे ही शक्यता धूसरच दिसत आहे.

सध्या भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) सांभाळत आहेत. लोकसभा होईपर्यंत तरी ही धुरा बावनकुळे सांभाळतील अशी चर्चा आहे. 2019 ला झालेल्या लोकसभा आणि 2020 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांना कोणतीही उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांना त्यावेळी पक्षाची जबाबदारी देण्यात आली होती. शिवाय विदर्भाची नाराजी ओढवून घेऊ नये यासाठी पक्षाने बावनकुळेंना संघटनेतील महत्त्वाचे पद दिले अशी चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Ravindra Chavan News
NCP News : अजित पवार गटाच्या वरिष्ठांकडून नेत्यांना मीडियासमोर अधिक न बोलण्याची ताकीद?

रवींद्र चव्हाण(Ravindra Chavan) सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. डोंबिवलीकर असलेले रवींद्र चव्हाण साध्या राहाणीमानामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र मंत्री म्हणून देखील ते उत्तम काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना अजून काही वर्ष तरी रवींद्र चव्हाण मंत्री म्हणूनच हवे आहेत.

तर सध्या बावनकुळे हे खासदारकीसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची माळ रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात पडणार का? अशी चर्चा दिसत आहे. कारण मंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा भाजपच्या वरच्या फळीतील नेते मानले जातात. असे असले तरी भाजप देखील त्यांचा विचार उमेदवार म्हणून करत असल्याने, प्रदेशाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

 Ravindra Chavan News
Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंचा नवा डाव? ओमी कलानी कुटुंबाशी का वाढवली जवळीक?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com